12 December 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय | सलग चौथ्या दिवशी ६० हजारहून अधिक रुग्ण

India, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, १० ऑगस्ट : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 लाख 15 हजार 945 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर 15 लाख 35 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 44, 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरातील कोरोना आकडेवारीचा विचार करता अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक कोरोनाची संख्या महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. शिवाय काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात १० राज्य अशी आहेत ज्याठिकाणी कोरोना संसर्गाचं प्रमाण ८० टक्के अधिक आहे. पण ही संख्या देखील लवकरच नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

 

News English Summary: Corona infection is on the rise in India. From August 1 to August 9, a large number of corona patients are reported to be on the rise. For the fourth day in a row, more than 60,000 new corona patients have been found.

News English Title: Single Day Spike Of 62064 Cases And 1007 Deaths Reported In India In The Last 24 Hours News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x