14 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

केंद्रीय गृहमंत्रालयाची विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास संमती, शिवसेनेची कोंडी

Union Secretary, Higher Education, Universities and educational institutions, Conduct examinations

नवी दिल्ली, ६ जुलै : कोरोना संकटात विद्यापीठांच्या परीक्षांवर प्रश्न चिन्ह उभं राहिलं आहे. मात्र आज केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्राद्वारे विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. विद्यापीठांच्या परीक्षा यूजीसी मार्गदर्शक सूचनांनुसार आणि स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरअंतर्गत घेण्यात याव्या, अशाही सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात आणि विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केलं गेलं नाही पाहिजे. यूजीसीच्या गाईडलाईनमध्ये आधीच या गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे की, अंतिम वर्षाच्या परीक्षा या झाल्याच पाहिजेत.

गृहमंत्रालयाने लागू केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल. राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे राज्य सरकारने विद्यापीठातील पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

दहा दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देताना व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यापीठांनी ठरवलेल्या सुत्रानुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले होते. तसेच यासाठी मोदींनी संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असं आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, आता केंद्रानेच आदेश दिल्याने य़ा परीक्षा विद्यापीठांना घ्याव्या लागणार आहेत.

 

News English Summary: Today, the Union Home Ministry has written to the Union Secretary of Higher Education authorizing universities and educational institutions to conduct examinations. The Union Home Ministry has directed that university examinations should be conducted in accordance with UGC guidelines and standard operating procedures.

News English Title: Union Secretary of Higher Education authorizing universities and educational institutions to conduct examinations News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x