18 September 2021 11:01 PM
अँप डाउनलोड

२०१७-१८ आर्थिक वर्षात प्राप्ती कराचा विक्रमी भरणा, तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (सीबीडीटी) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्सच्या भरणा विक्रमी म्हणजे तब्बल १०.०३ लाख कोटी रुपये इतका झाला असून तो आज पर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेच्या अधिकारी शबरी भट्टसाली यांनी दिलेल्या अधिकृत माहितीप्रमाणे २०१७-१८ या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे प्राप्ती कराचे परतावे भरण्याचा देखील उच्चांकी रेकॉर्ड झाला असून तब्बल ६.९२ कोटी करदात्यांनी कर परतावा भरला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या म्हणजे २०१६-१७ च्या ५.६१ कोटींच्या तुलनेत यंदा तब्बल १.३१ कोटी जास्त करदात्यांनी रिटर्न फाइल केल्याचे त्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा कर परतावा भरणाऱ्यांची संख्या तब्बल सव्वा कोटींनी वाढेल अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे, अशी माहिती पीटीआयनं दिलं आहे.

ईशान्य भारताचे इन्कम टॅक्स खात्याचे मुख्य आयुक्त एल.सी. जोळी रानी यांच्या माहितीनुसार ईशान्तूय भारतातूनही ७,००० कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. कारण गेल्या वर्षी ईशान्य भारतातून ६,००० कोटी रुपयांचा प्राप्ती कर जमा झाला होता असं ते म्हणाले.

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x