मुंबई : जनजागृती! शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांची जनजागृती करण्यासाठी एक अनोख्या पद्धतीची जाहिरात सध्या प्रसिद्ध होत आहे. त्यात अभिनेता अक्षय कुमार वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांना थांबवतो, तर हेल्मेट न घालणाऱ्या मुलाला थांबवून विचारतो ‘ये रोड तुम्हारे बाप की नहीं? तो बिना हेल्मेट पहने गाडी क्यूँ चला रहें हो?’ ‘याद रखो ट्रॅफिक नियमोंका पालन करो क्यूँके सडक किसीके बापकी नहीं.’ असे म्हणत अक्षय कुमारने वाहतूक नियम पाळण्यासंबंधीचा संदेश आणि जनजागृती करण्याची मोहीम आखली आहे.

परंतु विषय आणि हे अनोखं अभियान थोडं खोचक पद्धतीने वाटू लागल्याने ते लोकांना अधिक रचताना दिसत आहे. कारण त्यामुळेच ही जाहिरात अधिक जनजागृती करताना दिसत आहे आणि समाज माध्यमांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायरल होताना दिसत आहे. परंतु या जाहिरातीमागची मूळ संकल्पना ही एका मराठमोळ्या मुलीची असल्याचे समजते.

होय, मराठमोळ्या सायली कुलकर्णीची ही मूळ संकल्पना असल्याचं समजत. सायलीने एका अनोख्या पद्धतीने ही संकल्पना मांडून जनजागृती करण्याचा केलेला हा प्रयत्नं लोकांना आवडताना दिसत आहे. सायली कुलकर्णीचा वय २० वर्ष असून तिने विसाव्या वर्षीच तिच्यातल्या अनोख्या विचारपद्धतीच दर्शन घडवलं आहे असच म्हणावं लागेल. सायली ही मूळची सोलापूरची असून रघुनाथ कुलकर्णी यांची ती मुलगी आहे आणि याआधी सायलीने ‘पाणी बचाव’ या विषयावरही काम केल्याचं समजतं.

Sayali Kulkarni is the face behind campaign Sadak Suraksha Jeevan Raksha by Akshay Kumar