16 December 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Ajit Pawar | त्यांना तुरुंगात टाकणार असं मोदींनी वचन दिलेलं, आज NDA मध्ये सामावून घेतलं, ट्विटरवर 'गद्दार अजित पवार' ट्रेंडिंग मध्ये

Ajit Pawar

Ajit Pawar | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक होत आहे. यात ३८ राजकीय पक्षांची उपस्थिती अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यानुसार, एनडीएतून बाहेर पडलेले परंतु “भारताला मजबूत करण्यासाठी” पुन्हा युतीत सामील झालेल्या 38 पक्षांपैकी काही पक्ष आहेत. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या २६ विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया)’ असे नाव दिल्याने भाजपच्या अडचणी प्रचंड वाढल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलंय.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेंगळुरूयेथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूसिव्ह अलायन्स (इंडिया)’ असेल. या प्रस्तावाला सर्वांनी एका स्वरात पाठिंबा दिला. विरोधी आघाडीत ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून, मुंबई येथे होणाऱ्या पुढील बैठकीत सदस्यांची नावे जाहीर केली जातील.

खरगे पुढे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करण्यासाठी दिल्लीत एक सामायिक सचिवालय स्थापन केले जाईल. देशाला आणि जनतेला वाचवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी आम्ही मतभेद बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बठकीत महागाई आणि बेरोजगारी अशा जनतेच्या संबंधित गंभीर विषयांवर देखील चर्चा झाली अशी त्यांनी माहिती दिली.

ट्विटरवर #GaddarAjitPawar हॅशटॅग ट्रेंड

दरम्यान, भाजप प्रणित NDA च्या आजच्या दिल्लीतील बैठकीला युतीला सहकारी पक्षासोबत अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या वेळी अजित पवार यांनी गर्दीत पाठीमागून मोदींना नमस्कार केला आणि त्यावर मोदींनी सुद्धा त्यांना हात जोडत नमस्कार केला. त्यानंतर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी यांनी राष्ट्र्वादीतील भ्रष्ट नेत्यांचा उल्लेख करताना त्यांना तुरुंगात टाकण्याचं जाहीर वचन दिलं होतं. मात्र आता त्यांनी खुद्द अजित पवारांना राज्याच्या उपमुख्यमंत्री बनवताना थेट राज्याच्या अर्थखात्याची तिजोरी देखील अजित पवार यांना दिली आणि आता त्याच अजित पवारांना NDA सोबत घेऊन ते त्यांना नमस्कार देखील करत असल्याने समाज माध्यमांवर प्रचंड टीका सुरु झाली आहे. ट्विटरवर देखील “#GaddarAjitPawar” हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला असून मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल करणं सुरु झालं आहे.

News Title : Ajit Pawar joined NDA today check details on 18 July 2023.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar Trending (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x