17 May 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

भाजपप्रणीत NDA मध्ये 38 पक्ष, 24 पक्षांचा एकही खासदार नाही, 9 पक्षांचा प्रत्येकी 1 खासदार, फुटीरवादी गटाला स्थान देणं भाग पडलं

NDA Alliance

NDA Alliance | 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक होत आहे. यात ३८ राजकीय पक्षांची उपस्थिती अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यानुसार, एनडीएतून बाहेर पडलेले परंतु “भारताला मजबूत करण्यासाठी” पुन्हा युतीत सामील झालेल्या 38 पक्षांपैकी काही पक्ष आहेत. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या २६ विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीला ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया)’ असे नाव दिल्याने भाजपच्या अडचणी प्रचंड वाढल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलंय.

NDA मध्ये 38 पक्ष, पण 24 पक्षांचा एकही खासदार नाही तर …
एनडीच्या बैठकीचं एकूण 38 पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकी 24 पक्षांचा लोकसभेत एकही खासदार नाही. तर ९ पक्षांचे प्रत्येकी 1 खासदार आणि उर्वरित ३ पक्षांचे 2 खासदार लोकसभेत आहेत. या बैठकीत 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यात येत आहे.

या बैठकीला प्रत्येकाला बोलण्यासाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ देण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष या बैठकीत काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधकांच्या एक्यापुढे आगामी लोकसभा निवडणुकीत निवडून येणं हे भाजपसाठी जास्त आव्हानचं ठरण्याची शक्यता आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, भाजप प्रणित NDA च्या आजच्या दिल्लीतील बैठकीला युतीला सहकारी पक्षासोबत अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. पंतप्रधान मोदींच्या स्वागताच्या वेळी अजित पवार यांनी गर्दीत पाठीमागून मोदींना नमस्कार केला आणि त्यावर मोदींनी सुद्धा त्यांना हात जोडत नमस्कार केला. त्यानंतर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी यांनी राष्ट्र्वादीतील भ्रष्ट नेत्यांचा उल्लेख करताना त्यांना तुरुंगात टाकण्याचं जाहीर वचन दिलं होतं. मात्र आता त्यांनी खुद्द अजित पवारांना राज्याच्या उपमुख्यमंत्री बनवताना थेट राज्याच्या अर्थखात्याची तिजोरी देखील अजित पवार यांना दिली आणि आता त्याच अजित पवारांना NDA सोबत घेऊन ते त्यांना नमस्कार देखील करत असल्याने समाज माध्यमांवर प्रचंड टीका सुरु झाली आहे. ट्विटर देखील “#GaddarAjitPawar” हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला असून मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल करणं सुरु झालं आहे.

News Title : NDA Alliance meet at Delhi check details on 18 July 2023.

हॅशटॅग्स

#NDA Alliance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x