21 May 2024 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकी संबंधित येणाऱ्या विविध अपडेटमुळे आणि जागतिक नकारात्मक संकेतामुळे शेअर बाजारात कमजोरी पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाही निकालानंतर टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली आले आहेत. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के घसरणीसह 419.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने पुढील 12 महिन्यांत टाटा पॉवर स्टॉक 45 टक्के घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.19 टक्के घसरणीसह 412.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक 240 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर स्टॉक 75 टक्के आणि 12 महिन्यांत 110 टक्के मजबूत झाला आहे. ब्रोकिंग फर्म CLSA ने देखील टाटा पॉवर स्टॉकमध्ये जबरदस्त घसरणीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक 297 रुपये किमतीवर येऊ शकतो.

CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक आर्थिक वर्ष 2024-2025 च्या कमाईच्या अंदाजापेक्षा 35 टक्के महाग झाला आहे. टाटा पॉवर स्टॉकबाबत शेअर बाजारातील 21 तज्ञापैकी आठ जणांनी ‘बाय’ रेटिंग दिली आहे. मात्र तीन जणांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर 10 तज्ञांनी हा स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

मार्च 2024 तिमाहीत वार्षिक आधारावर टाटा पॉवर कंपनीच्या नफ्यात 11 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. टाटा पॉवर कंपनीने मार्च 2024 तिमाहीमध्ये 1046 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 939 कोटी रुपये नफा कमावला होता. 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 27 टक्के वाढीसह 15,846.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

यासह टाटा पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 2 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची शिफारस केली आहे. लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीने 4 जुलै 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 10 May 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x