15 December 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

Delhi Riots | दिल्लीत कोणत्याही घटनेनंतर अचानक हिंसाचार उफाळून आला नाही | सर्व काही पूर्वनियोजित होते - हायकोर्ट

Delhi riots

नवी दिल्ली, २८ सप्टेंबर | CAA कायद्यावरुन राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी जोरदार हिंसाचार उफाळून (Delhi riots) आला होता. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू तर कित्येक लोक जण गंभीर जखमी झाले होते. दिल्ली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. कारण राष्ट्रीय राजधानीत कोणत्याही घटनेनंतर अचानक हिंसा अचानक उफाळून आली नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला जामीन नाकारताना न्यायालयाने ही टीप्पणी केली.

The Delhi High Court said during the hearing that there was no sudden outbreak of violence after any incident in the national capital, Delhi riots was well preplanned said Delhi high court in hearing :

कोर्टाने पुढे म्हटले की, न्यायालयात सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलकांचे आचरण स्पष्ट दिसत आहे. सरकार तसेच शहरातील लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत करण्यासाठी ही दंगल सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नष्ट करणे हे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या आधीच नियोजित षडयंत्राची पुष्टी करते असेही न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने आरोपी मोहम्मद इब्राहिमचा जामीन नाकारला:
न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी डिसेंबरमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद इब्राहिमचा जामीन अर्ज फेटाळला. सुसंस्कृत समाजाच्या रचनेला धोक्यात आणण्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याचा वापर केला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. सीसीटीव्ही क्लिपमध्ये इब्राहिम तलवारीने जमावाला धमकी देताना दिसत आहे.

चांद बागमध्ये पोलिसांवर हल्ल्याशी संबंधित प्रकरण:
हे प्रकरण ईशान्य दिल्लीतील चांद बागमधील दंगलीदरम्यान पोलिसांवर जमावाने केलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. हिंसाचारादरम्यान, हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला असून दुसरा अधिकारी गंभीर जखमी झाला होता.

या महिन्यात दिल्ली कोर्टाने दिल्ली दंगलीसाठी पोलिसांना फटकारले होते. फाळणीनंतरच्या सर्वात भीषण दंगलीचा तपास दिल्ली पोलिसांनी केला होता, तो दु: खद असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. ही तपासणी असंवेदनशील आणि निष्क्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे असेही न्यायालयाने सुनावणीदम्यान म्हटले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Delhi riots was well preplanned said Delhi high court in hearing.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x