13 December 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

दिल्लीतील दंगल हा आरएसएस व भाजपाने रचलेला पूर्वनियोजित कट – प्रकाश आंबेडकर

RSS, BJP, Delhi Violence, Prakash Ambedkar

पंढरपूर: दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ही दंगल घडवून आणली. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते शनिवारी पंढरपूर येथे नाभिक समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी त्यांनी दिल्ली हिंसाचारावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, राजसत्ता धर्मसत्तेच्या ताब्यात गेली की कारभार व्यवस्थित चालू शकत नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जे घडलं तेच आता मोदींच्या काळात घडत आहे. दिल्लीच्या दंगलीत अनेकजण सैनिकी गणवेश परिधान करून घुसल्याचे सांगितले जाते. एका अहवालानुसार कोणीतरी २५ लाख सैनिकी गणवेश विकत घेतल्याची माहिती आहे. सरकारने या सगळ्याचा माग काढण्याची गरज आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीबाबत अपुरी माहिती असल्याने राज्यातील नेते वायफळ बडबड करीत असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले. हे प्रश्न केंद्राचे आहेत त्यात राज्ये काही करु शकत नाहीत, अशी विधान करणाऱ्या या मंत्र्यांना या प्रश्नांच गांभीर्यच नाही. सत्तेविना राहू न शकणाऱ्या या मंडळींना ही गावरान सत्ता असल्याचे वाटत आहे, अशा शब्दांत त्यांनी सीएए, एनआरसीचे समर्थन करणाऱ्या मंत्र्यांना टोला लगावला.

आंबेडकर यांनी यावेळी राज्याच्या अर्थसंकल्पावरही टीका केली. अर्थसंकल्पात ८ हजार कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र ही तूट १६ हजार कोटींची आहे. राज्याने दाखवलेली ८ हजार कोटींची तूट आणि केंद्राकडून मिळणारे ८ हजार कोटी अशी १६ हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष तूट असल्याचं आंबेडकर म्हणाले. सत्तेसाठी राज्यातील काँग्रेस आघाडीची शिवसेनेमागे फरफट सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 

News English Summery: The riots in Delhi were pre-planned. The Rashtriya Swayamsewak Sangh and the BJP created the riots. Therefore, do not be surprised if there is a riot in Delhi now, ”said Prakash Ambedkar, deputy Bahujan Front chief of police,. He was speaking at a nucleus community rally in Pandharpur on Saturday. This time he targeted the Modi government over the Delhi violence. He said that the administration could not function properly when the monarchy fell under the control of the Dharma. What happened in the time of Atal Bihari Vajpayee is now happening in Modi’s day. Many people are reported to have been wearing military uniforms in the Delhi riots. According to a report, it is reported that someone bought 25 lakh military uniforms. The government needs to track this down, ”said Prakash Ambedkar.

 

Web News Title: Story Delhi riots was planned by RSS and BJP says Prakash Ambedkar.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x