29 June 2022 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
x

कामाचा तणावामुळे मी व्हाइट हाऊसमध्ये मोनिका'सोबत शरीर संबंध ठेवलेले: माजी राष्ट्राध्यक्ष

Story Former US President Bill Clinton, sex relation, Monica Lewinsky

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पहिल्यांदा मोनिका लेविंस्कीसोबतच्या संबंधावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत क्लिंटन यांनी मोनिकासोबतचे संबंध मान्य केले आहे. मोनिका लेविंस्की प्रकरणामुळे क्लिंटन यांच्या कौटुंबिक आयुष्यात आणि अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

कामाचा ताण असल्याने आपण व्हाइट हाऊसमध्ये इंनटर्न असणाऱ्या मोनिका लेवेन्स्की सोबत शरीर संबंध ठेवले होते, असा धक्कादायक खुलासा अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी केला आहे. पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या आयुष्यावर आधारित “हलरी हुलू” या माहितीपटामधील मुलाखतीत बिल क्लिंटन यांनी हा खुलासा केला आहे. तसेच आपल्यामुळे मोनिकाचे आयुष्य उद्धवस्त झाल्याबद्दल त्यांनी तिची माफीही मागितली आहे. या माहितीपटाच्या निमित्ताने बिल यांनी पहिल्यांदाच मोनिकाबरोबरच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.

“या अफेरभोवतीच मोनिकाचे आयुष्य फिरत राहिले हे भयंकर आहे. त्यासाठी मी तिची माफी मागतो,” असंही बिल यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. हिलरी यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या माहितीपटामध्ये या दोघांचाही अगदी विद्यार्थीदशेपासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. “मी कोणत्याही निवडणुकीसाठी उभी नसल्याने मी या माहितीपटाला होकार दिला,” असं या माहितीपटासंदर्भात बोलताना हिलरी यांनी सांगितले.

बिल क्लिंटन यांनी या मुलाखतीत मोनिका लेंविस्कीची माफीदेखील मागितली. त्या घटनेनंतर माझं आयुष्य या प्रेमप्रकरणाशी जोडून पाहिले गेले असल्याचे क्लिंटन यांनी सांगितले. मोनिका प्रकरणाची सार्वजनिक आयुष्यात चर्चा सुरू झाल्यानंतर वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याची कबुली क्लिंटन यांनी दिली. पत्नी हिलरी क्लिंटनला याचा प्रचंड धक्का बसला होता असेही त्यांनी सांगितले. आयुष्यातील हा दु:खद प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले. क्लिंटन यांचे हे प्रकरण १९९८मध्ये उघडकीस आले होते.

 

News English Summery: Former US President Bill Clinton has spoken for the first time with Monica Lewinsky. In an interview, Clinton acknowledges her relationship with Monica. The Monica Lewinsky case triggered a rift between Clinton’s family life and the US political circle. In an interview, Clinton said there was a lot of stress at the time. The stress was increasing for a variety of reasons. By the time Monica met with Lewinsky, she was going through a lot of stress. He said that a boxer is tired after playing 30 rounds, as if he was tired. In the meantime a love affair with Monica was formed. Clinton also said the body was linked to Monica. Clinton said the relationship was linked to work stress.

 

Web News Title: Story Former US President Bill Clinton on sex relation with Monica Lewinsky.

हॅशटॅग्स

#WhiteHouse(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x