19 February 2025 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर घसरतोय, पण पुढे पैसे डबल होऊ शकतात, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | रुळावरून घसरतोय हा रेल्वे कंपनी शेअर, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरमधील घसरण थांबेना, मात्र तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: JIOFIN
x

राम मंदिर निर्माणासाठी महाविकास आघाडीचा पाठींबा – मंत्री हसन मुश्रीफ

Minister Hassan Mushrif, CM Uddhav Thackeray, Maha Vikas Aghadi

अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी तिसऱ्यांदा अयोध्येत आलो होते. अयोध्येते येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी वारंवार अयोध्येत येईन. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मी मुख्यमंत्री झालो. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आलो होतो. त्यावेळी चांगले यश मिळाले होते. मी अयोध्येला नियमित येत राहणार आहे. मी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेणार आहे.

याविषयी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याचे अगोदरच घोषीत केले होते. महाविकास आघाडीच्या सरकारचे शंभर दिवस निर्विघ्नपणे पार पडले आहेत. शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या दोन-तीन योजना मार्गी लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते अयोध्येला जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराचा प्रश्न मिटला आहे. शिवाय ठाकरे यांच्या अयोध्या भेटीच्या दौर्‍यात महाविकास आघाडीचे दोन मंत्रीही सहभागी होत आहेत.”

 

News English Summery: The development minister was also involved in Chief Minister Uddhav Thackeray’s visit to Ayodhya, he said. He was speaking at a press conference in Kolhapur. Musharraf said, “Chief Minister Uddhav Thackeray had already announced that he would be going to Ayodhya. The hundred days of the development-led government have gone smoothly. 2-3 plans on the agenda of Shiv Sena are under way. He is going to Ayodhya in the background. Due to the Supreme Court decision, the question of Ram temple has been erased. Apart from this, two ministers of development are also participating in Thackeray’s visit to Ayodhya.”

 

Web News Title: Story Maha Vikas Aaghadi supported for Ram Mandir nirman work says Minister Hassan Mushrif.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x