15 May 2021 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली
x

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात माझाही सहभाग होता | ते माझे पहिले आंदोलन होते - पंतप्रधान

Satyagraha, Bangladesh's freedom, PM Narendra Modi

ढाका, २६ मार्च: बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होते, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

तसेच, “मी आज भारताच्या शूर सैनिकांना सॅल्यूट करतो, जे मुक्तीजुद्धोमध्ये बांगलादेशच्या बंधू-भगिनींसोबत उभे राहिले. मला आनंद आहे की, बांगलादेश मुक्तीसंग्रमात भाग घेतलेले अनेक भारतीय सैनिक आज या कार्यक्रमास उपस्थित आहेत.” असं देखील मोदींनी यावेळी म्हटलं.

 

News English Summary: I would like to remind brothers & sisters in Bangladesh with pride, being involved in the struggle for independence of Bangladesh was one of first movements of my life. I must have been 20-22 years old when I and my colleagues did Satyagraha for Bangladesh’s freedom said PM Narendra Modi in Dhaka.

News English Title: I must have been 20 22 years old when I and my colleagues did Satyagraha for Bangladesh’s freedom said PM Narendra Modi in Dhaka news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x