28 April 2024 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Health First | जाणून घ्या भेंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा

benefits of okra

मुंबई २४ मे : उन्हाळ्यातील भाजीमध्ये एक भेंडी आहे, जी सर्व भाज्यांमध्ये विशेष मानली जाते. बर्‍याच लोकांची ही पहिली पसंती आहे, तर बऱ्याच लोकांना भेंडी ही आवडत नाहीत आपण उन्हाळ्यात भेंडी खाल्ल्यासरोगप्रतिकार शक्ती चांगली होते, भेंडी खाल्ल्याने बहुतेक रोगांशी लढा देण्यास शरीराला सामर्थ्य मिळते आणिशरीर सहजपणे व्हायरल इन्फेक्शनशी लढू शकते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.ही लेडी फिंगर म्हणून ओळखली जाते जी लहान मुलांना खूप आवडीची आहे. भेंडीचे काही फायदे जाणून घ्या.

१. भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

२. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

३. वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.

४. भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठीही भेंडी उपयुक्त आहे.

५. भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

६. गरोदरपणात भेंडीचे सेवन करणे फायदेशीर आहे. या मध्ये फोलेट नावाचे पोषक घटक आढळतात जे गर्भाच्या मेंदूच्या वाढीस महत्त्वाची भूमिका बजावते.या व्यतिरिक्त भेंडीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

७. भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे सेल्युलर मेटाबोलिझमद्वारे निर्मित मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. हे कण अंधत्व साठी कारणीभूत आहेत. याशिवाय भेंडी मोतीबिंदूपासूनही संरक्षण करते.

८. भेंडीमध्ये आढळणारा चिकट पदार्थ आपल्या हाडांसाठी उपयुक्त आहे. या मध्ये आढळणारे व्हिटॅमिन-के हाडे मजबूत करण्यास मदत करते.

९. अशक्तपणामध्ये देखील खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले लोह हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन-के रक्तस्त्राव थांबविण्याचे कार्य करते.

१०. भेंडी आपले हृदय देखील निरोगी ठेवते. त्यात उपस्थित पेक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, तसेच या मध्ये आढळणारे विरघळणारे फायबर, रक्तातील कोलेस्टेरॉलचे नियंत्रण करते ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

११. भेंडी आपल्या आहारात समाविष्ट केल्याने कर्क रोग पळवून लावू शकता. ही कोलन कर्करोग बरे करण्यात फायदेशीर आहे. हे आतड्या मधील असलेले विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करते, या मुळे आंतड्या स्वच्छ राहतात. आणि योग्यरीत्या काम करतात.

१२. भेंडी वजन कमी करण्यासह त्वचेला देखील तरुण ठेवते. याचे सेवन केल्याने केसांना सुंदर, घनदाट,आणि चमकदार करण्यासाठी करतात. याचे चिकट तत्व लिंबूसह शॅम्पू प्रमाणे वापरतात.

News English Summary: The summer vegetable has an okra, which is considered special among all vegetables. While this is the first choice of many people, many people do not like okra. Eating okra in summer improves the immune system. Eating okra strengthens the body to fight most diseases and the body can easily fight viral infections. This boosts the immune system. It is known as Lady Finger which is very popular among children. Learn some of the benefits of okra.

News English Title: Eating okra is beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x