2 May 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

VIDEO | महागाई, बेरोजगारी मुद्दे सोडून धार्मिक मुद्यांना बळ | बिहारमध्ये गोदी मीडिया हाय-हाय, गोदी मीडिया गो-बॅक घोषणाबाजी

Bihar Political Crisis

Bihar Political Crisis | राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी बिहारमधून देशातील विरोधी शक्तींना मोठा धडा दिला आहे. बिहारमध्ये महाआघाडी पुन्हा सरकार स्थापन करणार असून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. नितीशकुमार यांचा जेडीयू आता भाजप सोडून राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करत आहे. हे पाऊल म्हणजे देशातील सर्व विरोधी पक्षांसाठी मोठा संदेश आहे, असे तेजस्वी यादव यांनी मंगळवारी सांगितले. आम्ही दिशा दाखवली आहे. भाजप भीतीचे राजकारण करते, पण आम्हाला घाबरण्याची गरज नाही.

जनतेच्या प्रश्नावर न घाबरता उभे राहिलात तर :
प्रसारमाध्यमांना संबोधित करताना तेजस्वी म्हणाले की, जर तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर जनताही तुमच्यासोबत राहते. जनतेच्या प्रश्नावर न घाबरता उभे राहिलात, तर संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा राहू शकतो. विरोधकांनी एकजूट राहण्याची गरज आहे. भाजप देशभरात जो अजेंडा चालवत आहे तो लोकशाहीसाठी घातक आहे. केवळ धाक दाखवून आपले काम करणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. जो घाबरतो त्याला घाबरवा आणि जे विकते ते विकत घ्या.

भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवते :
तेजस्वी पुढे म्हणाले की, भाजपचा अजेंडा असा आहे की ते प्रथम आपल्या मित्रपक्षांची विल्हेवाट लावतात. पंजाब आणि महाराष्ट्र ही त्याची उदाहरणे आहेत. या राज्यांमध्ये जे घडले ते कुणापासून लपून राहिलेले नाही. भाजपला कोणताही पक्ष वाढू द्यायचा नाही, तो ज्याच्याबरोबर राहतो त्याला सेटल करण्यात मग्न आहे.

महागाई, बेरोजगारीचे मुद्दे विरुद्ध गोडी मीडिया :
नितीशकुमार यांची नाराजी ओळखून भाजपने सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांच्या दुखावलेल्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला. कारण २०२४ मध्ये अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, हे भाजपालाही माहीत आहे. मात्र त्यानंतर मोदी सरकार धार्जिण्या टीव्ही वृत्तवाहिन्यांवर नितीश कुमार यांच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात झाल्याचं बिहारची जनता पाहत आहे. देशातील सामान्य लोकांशी निगडित महागाई, बेरोजगारी आणि बिघडलेली अर्थव्यवस्था यावर भाष्य ना करता केवळ मोदींच्या जयजयकारात व्यस्त राहणाऱ्या या रिपोर्टर्सवर बिहारमधील लोकं संतापल्याचं पाहायला मिळतंय. अंजना ओमकश्यप यांना बिहारची राजधानी पटणा मध्ये घेरून जोरदार घोषणाबाजी केलीगेली. गोदी मीडिया हाय-हाय, गोदी मीडिया गो-बॅक अशी जोरदार घोषणाजी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.

 

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bihar Political Crisis Peoples against Godi Media check details 10 August 2022.

हॅशटॅग्स

#Bihar Political Crisis(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x