15 December 2024 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

Bonus on Insurance | गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, तुमच्यकडे या कंपनीचा इन्शुरन्स आहे का? मग तुम्हाला इतका बोनस मिळणार

bonus on insurance

Bonus on insurance | टाटा समूहाच्या या कंपनीने 2021- 2022 या आर्थिक वर्षात आपल्या पॉलिसीधारकांना 861 कोटी रुपयांचा बोनस देण्याचे जाहीर केले आहे. सलग पाच वर्षापासून TATA AIA Life आपल्या पॉलिसीधारकांना बोनस देत आहे.

टाटा समूहाची कंपनी TATA AIA लाइफने पॉलिसीधारकांना जबरदस्त आनंददायक बातमी दिली आहे. खरं तर या कंपनीने 2021-2022 या आर्थिक वर्षात त्यांच्या पॉलिसीधारकांना 861 कोटी रुपयांचा बोनस देण्याचे जाहीर केले आहे. TATA AIA Life आपल्या पॉलिसीधारकांना सलग 5 वर्षापासून असे जबरदस्त बोनस देत आहे.

भरघोस परतावा :
आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये आपल्या पॉलिसीधारकांसोबत वाटप केलेल्या नफ्यापेक्षा ही बोनस ची रक्कम 20 टक्के जास्त आहे. TATA AIA Life कंपनीच्या मते, सध्या जाहीर केलेले बोनस आतापर्यंतचे सर्वात मोठे बोनस वितरण असेल. त्याच वेळी, फक्त तेच पॉलिसीधारक याचा लाभ घेऊ शकतील ज्यांनी 31 मार्च 2022 पूर्वी पॉलिसी घेतली आहे. TATA AIA Life हा टाटा समूह आणि AIA ग्रुप लिमिटेड यांनी संयुक्त पणे सुरू केलेला उपक्रम आहे.

बोनस कधी मिळेल :
लाइफ इन्शुरन्स कंपन्यांनी जाहीर केलेला बोनस सिक्युरिटीज आणि इतर मोठ्या गुंतवणुकीतून कमावलेल्या परताव्यावर आधारित असतो. ते प्रति 1000 रुपये एकक या प्रमाणे निश्चित रक्कम असू शकते. समजा बोनस प्रती 1,000 रुपये साठी 50 रुपये असू शकतो.

जर समजा तुमची विमा रक्कम 5 लाख रुपये आहे, त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या बोनसची रक्कम 25,000 रुपये असेल. ही बोनस रक्कम तुम्हाला विमा सरेंडर केल्यावर प्राप्त होईल. अनेक कंपन्या विमा कालावधी दरम्यान बोनसची पूर्तता करत असतात. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे नियम असतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus on insurance has declared by Tata AIA life insurance company in 10 August 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x