15 May 2021 10:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

CBI प्रकरण: सुप्रीम कोर्टाकडून हंगामी संचालकांवरच निर्बंध

नवी दिल्ली : सीबीआयमधील २ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वादावर आणि केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. दरम्यान, न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी थेट हंगामी सीबीआय संचालक एम. नागेश्वर राव यांच्यावर निर्बंध लादत आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची चौकशी २ आठवड्यांत पूर्ण करण्याचे थेट आदेश सीव्हीसीला दिले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

CBI मधील २ अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशाभरातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. काँग्रेसने देशभर सीबीआय मुख्यालयासमोर आंदोलन सुरु केले असून त्यात स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सहभागी झाले आहेत. त्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले असून मोदी सरकार सुद्धा संशयाच्या भवऱ्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आज संबंधित प्रकरणावर दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान न्यायमूर्ती तरुण गोगोई यांनी थेट चौकशीचे आदेश जारी केले आहेत. त्यासाठी सीव्हीसीच्या वकिलांनी १० दिवस अपुरे असून ३ आठवड्यांचा कालावधी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे काही दिवसात चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु, सीबीआय मधील या घडामोडींनी विरोधकांना सुद्धा आयतीच संधी चालून आली आहे, असं चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1541)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x