23 November 2019 8:15 AM
अँप डाउनलोड

भविष्यात सुद्धा ब्राह्मण समाज देशाचे नेतृत्व करत राहील

पुणे :  सध्या आपल्या समाजात असमानता निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु, देशात ही असमानता निर्माण करणाऱ्या बारामतीकरांच्या हे ध्यानात येत नाही की यापूर्वी सुद्धा ब्राह्मण समाजाने आपल्या देशाचे नेतृत्व केले होते आणि त्याप्रमाणेच भविष्यात सुद्धा करतच राहील, असे सांगत पुण्याच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली आहे.

संत ज्ञानेश्वरांनी दुसऱ्यांसाठी पसायदान मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य झिजवले, याची आठवण सुद्धा आमदार मेधा कुलकर्णी यांनी करून दिली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘ब्रह्मोद्योग-२०१८’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्या विचार मांडल.

दरम्यान, महोत्सवातील ‘मातृशक्तीचा जागर’ या मेळाव्यात मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या भूमिकेबाबत विचार व्यक्त केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, ‘संत ज्ञानेश्वरांनी दुसऱ्यांसाठी पसायदान मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक अशा अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजवले, असे नमूद करत ब्राह्मण समाज देशात पूर्वीपासूनच समाजासाठी झटत आला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

BJP(415)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या