4 August 2020 1:42 PM
अँप डाउनलोड

लैंगिक शोषणाच्या आरोपावरून; गुगलकडून ४८ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असली तरी, न्यूयॉर्क टाइम्सच्या या बातमीत गुगलने लैंगिक गैतवर्तवणुकीचा आरोप असलेल्या आपल्या तीन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम देत वाचवलं असल्याचा दावा करण्याता आला होता. सुंदर पिचाई यांनी त्यांच्या ई-मेलमध्ये ज्या ४८ कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तवणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, त्यातील १३ कर्मचारी हे सीनिअर मॅनेजर किंवा सीनिअर पोस्टवरील कर्मचारी होते अशी माहिती प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

दरम्यान, जगभरात #MeToo मोहिमेमुळे स्त्रिया आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत असताना गुगल सारख्या जागतिक कंपनीमध्ये सुद्धा महिलांसाठी सुरक्षित वातावरण नसल्याचे उघडकीस आले आहे. अखेर लैंगिक गैरवर्तवणुकीची गंभीर दखल घेत गुगलने मागील २ वर्षात एकूण ४८ कर्मचाऱ्यांना कामावरुन हकालपट्टी केल्याची माहिती खुद्द गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी दिली आहे. सुंदर पिचाई यांनी गुगलच्या कर्मचाऱ्यांना एक अधिकृत ई-मेल पाठवला आहे. यामध्ये कंपनीच्या व्यवस्थापन विभागातील काही वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे जागतिक क्रमवारीतील या उच्च कंपनीतील घडामोडीने महिलांबाबतच्या एकूणच असुरक्षित वातावरणाची साक्ष दिली आहे असच म्हणावं लागेल.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x