28 March 2023 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा Tax Exemption Claim | तुमच्या पगारात DA, TA, HRA सह इतर अनेक भत्ते असतात, कशावर किती टॅक्स सूट मिळते पहा SBI FD Vs SBI Annuity Deposit Scheme | दर महिन्याला कमाईसाठी SBI ची कोणती योजना बेस्ट? दर महिन्याचा खर्च भागेल Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या
x

कोरोना आपत्तीमुळे WhatsApp ची मोठी घोषणा, हे बदल केले

Corona Crisis, Covid19, Whatsapp

मुंबई, ७ एप्रिल: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात सोशल मीडियावरही अफवा आणि खोट्या बातम्यांचं पीक आलं आहे. अशा अफवा आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी आता व्हॉट्सऍपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍपने फॉरवर्ड मेसेज पाठवण्यावर निर्बंध आणले आहेत.

व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही व्यक्तीला व्हायरल होत असलेले मेसेज, मीम, फोटो किंवा व्हिडिओ एकापेक्षा जास्त लोकांना फॉरवर्ड करता येणार नाहीत. कोरोना व्हायरसबाबत खऱ्या माहितीऐवजी खोटी माहिती मिळाली तर लोकं प्रभावित होऊ शकतात, असं कंपनीने सांगितलं आहे. याआधी व्हॉट्सऍपने मेसेज फॉरवर्ड करण्याची क्षमता ५ पर्यंत मर्यादित ठेवली होती.

व्हॉट्सऍपने एकाचवेळी पाच जणांना मेसेज फॉरवर्डींग करण्यात येत असलेल्या मेसेजवर मर्यादा आणली आहे. युजर्स आता केवळ एकाच व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करू शकणार आहे. याआधी एकाचवेळी पाच व्यक्तींना मेसेज पाठवता येवू शकत होता. करोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना व्हाट्सअँपवर काही जण जाणीवपूर्वक मेसेजमधून फेक बातम्या व्हायरल करीत आहेत. या फेक बातम्या पसरू नये, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

याआधी फेसबुकने फेक न्यूज रोखण्यासाठी असाच धाडसी निर्णय घेतला होता. तर गुगलने खोट्या रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. तसेच मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरनेहे खोट्या बातम्या रोखण्यासाठी फिल्टर करणे सुरू केले आहे. व्हॉट्सऍपने घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक होत आहे. कंपनीचा हा निर्णय चांगला आहे.

 

News English Summary: The Corona virus is widespread worldwide. Even in India, the number of coronary patients is increasing day by day. Rumors and false news have also surfaced on social media during this time of the Corona infection. Now, WhatsApp has made an important decision to prevent such rumors and false news. WhatsApp has banned sending forward messages.

 

News English Title: Story whatsapp is limiting forward Messages feature from five to one Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x