27 July 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

जगभर '#DeleteFacebook' नंतर 'DeleteNamoApp' मोहीम जोरात

नवी दिल्ली : फेसबुक डेटा लीकवरून जगभर वादंग निर्माण झाल्याने सर्वत्र ‘#DeleteFacebook’ मोहिमेने जोर पकडला आहे. आता देशभरात ‘#DeleteNamoApp’ मोहीम जोर पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात धक्कादायक तांत्रिक खुलासे सुद्धा पुराव्यानिशी बाहेर येत आहेत. कारण नरेंद्र मोदी अँपवर प्रोफाइल तयार करणाऱ्यांची खासगी माहिती ‘क्लेवर टॅप एलएलसी’ या अमेरिकन कंपनीकडे पाठवली जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

नमो-अँप वापरणाऱ्या भारतीयांची खासगी माहिती सुरक्षित नसून ती अमेरिकेतील ‘क्लेवर टॅप एलएलसी’ या कंपनीकडे दिली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विट करून केला आहे. फेसबुक डेटा लीकवरून जगभर वादंग निर्माण झाल्याने सर्वत्र ‘#DeleteFacebook’ मोहिमेने जोर पकडत असताना, आता देशभरात खासगी माहिती सुरक्षेच्या कारणाने ‘#DeleteNamoApp’ मोहीम जोर पकडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर ‘#DeleteNamoApp’ अशी मोहीमच राबविण्यात येत आहे. त्याला अनुसरूनच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विट करताना म्हटले आहे की, “मी नरेंद्र मोदी, मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही जेव्हा माझ्या अधिकृत अँपवर साइनअप करता, त्यावेळी तुमचा सर्व डेटा मी अमेरिकन कंपनीतील माझ्या मित्रांना देतो,” असा खोचक आणि उपरोधिक टोला लगावला आहे. त्यामुळेच लोकांची खासगी माहिती नमो-अँप वर सुरक्षित नसून, त्या माहितीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करून सोशल मीडियावर ‘हॅशटॅग डिलीट नमो अँप’ नावाने मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

परंतु भाजपने कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधीना तंत्रज्ञानातलं काहीच कळत नाही आणि ते केवळ तंत्रज्ञानाबद्दल गैरसमज पसरवत आहेत इतकीच प्रतिक्रिया दिली आहे. परंतु उपस्थित झालेल्या इतर तांत्रिक प्रश्नांवर मौन बाळगले आहे. गुगल अनॅलिटीक्ससाठी त्याचा वापर होतो एवढंच उत्तर दिल असून ‘सर्व्हर’ संबंधित प्रश्न अनुत्तरीतच ठेवले आहेत. लोकांना त्यातील तांत्रिक मुद्दे समजत नाहीत त्याचा अप्रत्यक्ष फायदा अखेर नमो-अँपलाच होऊ शकतो.

 

विशेष म्हणजे डिसेंबर २०१६ मध्येच जावेद खत्री या २२ वर्षाच्या युवकाने ‘नमो-अँप’ सुरक्षित नसून ते कोणी सुद्धा हॅक करू शकत हे पुराव्यानिशी दाखवलं होत आणि विशेष म्हणजे जावेद खत्री हा २२ वर्षीय तरुण मोबाईल अँप डेव्हलपर आणि इथिकल हॅकर आहे. ती बातमी एका नामांकित स्टार्टअप ऑनलाईन मॅगझीन ने २०१६ मध्ये प्रकाशित केली होती, परंतु नंतर त्यांनी ती कोणाच्या दबावाने आणि का ‘डिलीट’ केली होती ते अजूनही कळू शकले नाही.

दुसरं धक्कादायक म्हणजे एका ‘फ्रेंच सेक्युरिटी संशोधकाने’ नमो-अँप संबंधित सर्वच तांत्रिक धक्कादायक खुलासे ट्विटर वर पुराव्यानिशी केले आहेत. त्यामध्ये सर्व माहिती कशी ‘क्लेवर टॅप एलएलसी’ च्या सर्व्हर वर जात आहे ते पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. ‘क्लेवर टॅप एलएलसी’ या कंपनीची मुंबई, बंगलोर, लॉस एंजेलस, सॅन फ्रान्सिस्को , नवी दिल्लीत कार्यालय असल्याचे समजते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x