30 November 2022 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

त्रिपुरात लोकसभेच्या २ जागा आहेत, मग भाजपने देशभर आनंद व्यक्त का केला ? विरोधक

नवी दिल्ली : सपा – बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आले म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा २ जागांवर पराभव झाला असे विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिल्याने विरोधकांकडून ही प्रतिक्रिया कानावर येत आहे.

समाजवादी पक्ष आणि बसपा शेवटच्या क्षणी एकत्र आल्याने उत्तर प्रदेश मधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता असं मान्य करून, भाजपने पराभवाचे नक्की कारण शोधण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. पुढे येणाऱ्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप एकूण मतदानाच्या पन्नास टक्के मतदान मिळवून सर्वात मोठा पक्ष असेल असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसच सपा-बसपाची ती खेळी २०१९ मध्ये निष्फळ ठरेल असं ही अमित शहा म्हणाले.

मुळात उत्तर प्रदेशातील निवडणूक ही केवळ २ जागांपुरतीच होती तरी सुद्धा काँग्रेसने मिठाई वाटल्याचे समजले. परंतु आम्ही त्यांच्याकडून ११ राज्य घेतली तसेच त्रिपुराबाबत सुद्धा कोणी बोलत नाही. मुळात पोटनिवडणुका ह्या स्थानिक मुद्यांवर केंद्रित असतात. त्याविरुद्ध सार्वत्रिक लोकसभा निवडणूकात मोठे मुद्दे विचारात घेतले जातात असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आणि टीडीपी बाबत विचारले असता अमित शहा म्हणाले की, एकूण ११ मित्र पक्षांपैक एकानेच एनडीएला रामराम ठोकला आहे आणि त्यांनी आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी पुस्ती सुद्धा त्यांनी जोडली. अमित शहा जरी केवळ एकच पक्ष सोडून गेल्याचे म्हणाले असले तरी वास्तविक पाहता शिवसेना आणि गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुद्धा एनडीए बरोबर फारकत घेतली आहे आणि अकाली दल सुद्धा नाराज असल्याचे समजते.

काय म्हणत आहेत विरोधक अमित शहांच्या युपी मधील ‘केवळ दोन’ जागांच्या वक्तव्यावर,

जर अमित शहा असं म्हणत असतील कि विरोधकांनी यूपीतील लोकसभेच्या केवळ २ जागा जिंकल्या म्हणून देशभर आनंद व्यक्त केला होता. भाजपने त्रिपुरा विधानसभा जिंकली असली तरी, संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ २ जागा आहेत हे माहित असताना अमित शहांनी नागालँड आणि मणिपूर चे निकाल येण्यापूर्वीच घाई घाईत पत्रकार परिषद का बोलावली. त्यामागील मुख्य कारण देशभरात केवळ हवानिर्मिती करून वातावरण तापत ठेवणे असाच होता. वास्तविक संपूर्ण त्रिपुरात लोकसभेच्या केवळ दोनच जागा आहेत, जसं अमित शहा यूपीतील पराभवाचे वर्णन करताना लोकसभेच्या केवळ २ जागा आम्ही हरलो, ज्याने काहीच फरक पडत नाही असं स्पष्टीकरण देत आहेत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(262)#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x