29 April 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

Special Recipe | ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी खास रेसिपी

Pudding recipe in Marathi

मुंबई, १२ ऑगस्ट | घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनुभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी खास रेसिपी…

साहित्य :
* ६ ब्रेड स्लाइस
* १ अंड
* दीड कप दूध
* अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क
* पाव चमचा वॅनिला इसेन्स
* ३ मोठे चमचे साखर

कृती:
१. ब्रेड स्लाइस मिक्सरमध्ये फिरवून ब्रेडचा चुरा करून घ्यावा.
२. एका भांड्यात मोठा चमचा साखर घालून कॅरॅमल करावं आणि भांड्याच्या तळ्याशी पसरावं.
३. अंड, दूध, कंडेन्स्ड मिल्क, उरलेली साखर आणि इसेन्स एकत्र घुसळावे आणि त्यात ब्रेडचा चुरा घालून ते मिश्रण कॅरॅमल पसरलेल्या भांड्यात ओतावे.
४. या भांड्याच्या तोंडावर बटरपेपर बांधून ते कुकरमध्ये ठेवावे आणि प्रेशर आल्यावर गॅस बारीक करून ८/१० मिन ठेवून गॅस बंद करावा.
५. प्रेशर जाऊन कुकर थंड झाला की पुडिंग बाहेर काढून कडेने सोडवाव आणि प्लेटमध्ये उलटवावे. फ्रीझ मध्ये ठेवून गार झाल्यावर द्यावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Bread Pudding recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x