23 September 2021 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Maratha Reservation | आरक्षण मिळवण्यासाठी आधी मागासलेपण सिद्ध करावे लागेल - संभाजीराजे छत्रपती

Maratha reservation

औरंगाबाद, १९ ऑगस्ट | इच्छा नसताना मराठा समाजाला पुन्हा आंदोलनाला सुरुवात करावी लागत आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 127 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती राज्याचा दौरा करत आहेत. ते पैठणगेट येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आरक्षणासाठी समाजाला मागासलेपण सिद्ध करावे लागेल (MP Sambhaji Raje Chhatrapati on Maratha reservation movement in Aurangabad) :

शुक्रवारी नांदेडमधून आंदोलनाची सुरुवात करत आहोत, अशी माहिती संभाजीराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी दिली. राज्याला अधिकार दिले म्हणजे तातडीने आरक्षण मिळेल, असे होत नाही. त्यासाठी मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावे लागेल. एक वेगळा प्रवर्ग तयार करावा लागेल. त्यानंतर आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी नांदेड येथे होणाऱ्या आंदोलनासाठी जात असताना गुरुवारी (दि. 19 ऑगस्ट) औरंगाबादेत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पैठणगेट भागात राजांच्या स्वागत केल्यावर मराठा क्रांतीमोर्चा समन्वयकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या. तसेच आंदोलकांकडून शासनाच्या विविध निर्णयाची प्रत फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सात जणांना क्रांतिचौक पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MP Sambhaji Raje Chhatrapati on Maratha reservation movement in Aurangabad news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x