19 August 2022 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या सरकारी बँका, कंपन्या नंतर मोदी सरकार नेहरूंनी उभारलेल्या देशातील पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलचे खासगीकरण करणार
x

मोदी जगभ्रमंती करणारे आजवरचे सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरले आहेत

नवी दिल्ली : मोदींच्या जगभ्रमंतीवर ४ वर्षात तब्बल १४८४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच त्यांनी ४ वर्षात १७१ दिवस म्हणजे एकूण १२ टक्के वेळ परदेश वास्तव्यात गेला आहे. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात म्हणजे एकूण ९ वर्षात परदेशवारीवर केवळ ६४२ कोटी रुपये खर्च झाला होता.

आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या परदेश दौर्यादरम्यान ते आफ्रिकेतील रवांडा आणि युगांडा या दोन देशांना ते भेट देणार आहेत असल्याचे सांगण्यात आले आहे. मोदींच्या आजवरच्या म्हणजे ४ वर्षातील परदेश दौऱ्याच्या खर्चाचा विचार केल्यास नरेंद्र मोदी हे जगभ्रमंती करणारे भारताचे आजवरचे सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरले आहेत.

मागील ४ वर्षात नरेंद्र मोदींनी ५४ देशांचा दौरा केला आहे. त्यांच्या या ५४ देशांच्या दौऱ्यावर आजवर एकूण १,४८४ कोटी रुपये इतका प्रचंड खर्च झाला आहे. त्यांनी परदेशवारीत केलेल्या एकूण वास्तव्यानुसार त्यांनी तब्बल १२ टक्के वेळ परदेशात व्यतीत केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x