15 December 2024 10:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BEL Share Price | सध्या शेअरची किंमत 184 रुपये! परतावा दिला 85014 टक्के, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.027 टक्के वाढीसह 187.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.37 लाख कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 190 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.

मागील 1 महिन्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमवून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 184.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 30 जानेवारी 2023 रोजी 89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या गुंतवणूकदारांनी पैसे लावले होते, त्यांना 100 टक्केपेक्षा जास्त नफा मिळाला आहे. 18 जानेवारी 2019 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर गुंतवणूक केली होती, त्यांनी 551 टक्के परतावा कमावला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 22 पैशांवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांना एकूण 85014 टक्के नफा मिळाला आहे.

29 जानेवारी 2024 रोजी बीईएल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यासह कंपनी शेअरधारकांना लाभांश देखील वाटप करू शकते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने मागील वर्षी ऑगस्ट, मार्च आणि फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप केला होता.

2022 मध्ये देखील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने ऑगस्ट, मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा लाभांश वाटप केला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 मे 2020 रोजी कोरोना काळात 20 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्या गुंतवणूकदारांनी एकूण 830 टक्के परतावा कमावला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची कामगिरी पाहून अनेक ब्रोकरेज तज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकची टार्गेट प्राइस 208 ते 210 रुपये निश्चित केली आहे.

मागील एका महिन्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के वाढली आहे. नुकताच भारतीय लष्कराने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला 4522 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला विविध कॅलिबर्सच्या फ्यूजचा पुरवठा करायचा आहे.

15 डिसेंबर 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी आणि भारतीय लष्कर यांच्यात हा करार झाला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी विविध उत्पादने इंडियन इलेक्ट्रॉनिक्स अँड असोसिएटेड इंडस्ट्रीजकडून खरेदी करते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी जे उपकरण बनवते, ते आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत बनवते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 18 January 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x