25 September 2020 12:08 AM
अँप डाउनलोड

तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी मिळणार?

Muslim Community, Muslim, PM Modi, PM Narendra Modi, Prime Minister Narendra Modi, Rajyasabha, Loksabha, Parliament, Sansad

नवी दिल्ली : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. भारतीय जनता पक्ष खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला एनडीएचे घटकपक्ष आणि अन्य इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ट्रिपल तलाक विधेयकाला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कडाडून विरोध दर्शवला. ते लोकसभेत बोलत असताना त्यांनी हे विधेयक आणले गेले तर किती तोटे होतील याचा एक पाढाच वाचून दाखवला. मात्र भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांनी मात्र त्यांना जशास तसे उत्तर दिले. एवढंच नाही तर किती साध्या साध्या कारणांवरुन ट्रिपल तलाक दिला जातो हेदेखील सांगितले. लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता राज्यसभेत मंजुरी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे.

त्रिवार तलाक विधेयकावर माहितीचा अधिकार विधेयकाप्रमाणेच मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. २४० सदस्यांच्या राज्यसभेत भाजप आणि मित्रपक्षांपाशी ११९ मते आहेत. पण बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, शरद पवारांच्या एनसीपी यांच्यापैकी काही पक्षांच्या सदस्यांना अनुपस्थित राहायला, तर काहींना सभात्याग करायला लावून विरोधकांच्या गोटातील १२१ मतांपैकी किमान वीसेक मतांना खिंडार पाडून बहुमताची सरशी साधण्याचे डावपेच भारतीय जनता पक्षाने आखले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

विधेयकाच्या समर्थनार्थ होणारं संभाव्य मतदान
भाजपा – ७८
असम गण परिषद – १
नगा पीपल्स फ्रंट – १
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – १
सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट- १
शिवसेना- ३
लोक जनशक्ती पार्टी- १
अपक्ष – ४
बीजू जनता दल – ७
नामनिर्देशित सदस्य – ३
एकूण संख्याबळ – १०८

विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे
काँग्रेस – ४८
तृणमूल कांग्रेस- १३
आम आदमी पार्टी- ३
बहुजन समाज पार्टी- ४
समाजवादी पार्टी- १२
द्रविण मुनेत्र कड़गम- ३
जनता दल(सेक्युलर)- १
राष्ट्रीय जनता दल- ५
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी- ४
भारतीय कम्युनिस्ट पार्टी- २
भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी- ५
इंडियन यूनियन मुस्लिम लीग- १
केरळ मणि कांग्रेस -१
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी- २
तेलगू देशम पार्टी- २
अपक्ष- २
नामनिर्देशित सदस्य- १

एकूण संख्याबळ – १०९

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#Narendra Modi(1317)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x