3 July 2020 2:53 PM
अँप डाउनलोड

गोव्यात भाजप सरकारकडून परप्रांतीयांना हुसकावण्यास सुरुवात

Goa, Goa State Government, outsiders, migrants, Uttar Bharatiya, Bhihari, Parpratiya

मुंबई : महाराष्ट्रात परप्रांतियांचं राजकारण यापूर्वी अनेकवेळा पाहिलं असेल, मात्र त्याच मुद्द्याने सध्या गोव्यात पेट घेतला आहे. गोव्याच्या विविध भागात थेट पोलिसांनाच कारवाईचे आदेश गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले आहेत. त्यानुसार अनेक महत्वाच्या ठिकाणांवरून तसेच सामान्यांना त्रासदायक ठरणाऱ्या ठिकाणावरून परप्रांतीयांना पोलिसच पळवून लावत आहेत. गोवा सरकारच्या या धडक कारवाईचं स्थानिक लोकांनी देखील कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एकूणच गोवा येथील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने परप्रांतीयांची अनेक भागातून हकालपट्टी सुरू केली आहे आणि स्थानिक देखील त्यासाठी मदत करत आहेत. पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाभोवती मुक्काम ठोकून राहिलेल्या परप्रांतीयांना त्याचा पहिला प्रत्यय आला. स्मारकाचे पावित्र्य भंग करणाऱया या परप्रांतीयांना पोलिसांनी तेथून हुसकावून लावले. तसेच ते पुन्हा तिथे येऊ नयेत म्हणून बारीक लक्षही ठेवले जाणार आहे.

आझाद मैदानावरील स्मारक हे परप्रांतीयांचा अड्डाच बनला होता आणि त्याचा येथून येजा करणाऱ्या स्थानिक लोकांना प्रचंड त्रास होत होता. या मैदानावर वर्षभर विविध कार्यक्रम सुरू असतात. त्या कार्यक्रमा दरम्यान देखील हे परप्रांतीय मैदानावर बिनधास्त झोपा काढत असतात आणि महिलांना येथून प्रवासादरम्यान देखील अडचणींचा सामना करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी माजी सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने कारगील विजय दिवस कार्यक्रम नुकताच साजरा केला गेला होता. त्या वेळी देखील हे परप्रांतीय स्मारकाजवळ झोपले होते आणि त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला होता. त्यांच्यामुळेच स्मारकाच्या आसपास सिगारेट्स, वेफर्सची पाकिटे, जेवणाच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. मैदानावरच्या सुलभ शौचालयाने त्यांची चांगलीच सोय केली आहे. तिथे त्यांच्या स्वच्छतेची सोय होते आणि मैदानातल्या झाडांवर कपडे वाळत टाकायला मिळतात.

माजी सैनिक कल्याण संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार बाबूश मोनस्रात, महापौर उदय मडकईकर आणि पणजी पोलिसांकडे या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पोलिसांनी परप्रांतीयांची हकालपट्टी सुरू केली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Goa(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x