25 April 2024 7:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

मोदी लाट नसताना 'मोदी-त्सुनामी' आली आणि या बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल

Narendra Modi, Udhav Thackeray, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.

त्यात आता राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील संताप व्यक्त करत स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. त्यात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, देशात मोदी लाट अजिबात नव्हती आणि त्याउलट मोदी विरोधी लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसहित, बेरोजगारी, आर्थिक उन्नती असे अनेक महत्वाचे प्रश्न असताना भारतीय जनता पक्षाला देशभरात बहुमत मिळणं ही न पटणारी गोष्ट आहे. जर सत्ताधाऱ्यांना ईव्हीएम’च्या माध्यमातून पुन्हा सत्ता हस्तगत करायची होती तर निवडणूक तरी कशाला घ्यायची होती, असे मत व्यक्त करत खासदार उदयराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम’वर संशय व्यक्त केला आहे एवढाच विषय नसून सर्वाधिक संशय हा एनडीए’मधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेने केला आहे. त्यात संदर्भात अनेक पत्रकार परिषदेत आणि खुद्द सामनामध्ये ईव्हीएम’वर संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशा अनेक आरोपांमधील खासदार संजय राऊत यांनी केलेले एक धक्कादायक विधान म्हणजे ‘निवडणूक आयोग म्हणजे एक टवायफ आहे’ असं त्यांनी एअनआय’ला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. दुसरा धक्कादायक आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी थेट सामनाच्या अग्रेलेखातून केला होता. त्यात थेट ‘EMV सोबत असेल तर देशात काय तर अमेरिकेत सुद्धा भाजपाची सत्ता येईल’.

नेमक्या त्याच सत्ताधाऱ्यांच्या बातम्या समाज माध्यमांवर फिरताना दिसत असून, केवळ विरोधकच नव्हे तर सत्ताधाऱ्यांना सुद्धा EVM’वर प्रचंड संशय असल्याचे दाखले देण्यात येत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x