4 May 2024 12:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

धक्कादायक! मुस्लिम तरुणाची टोपी काढली व जय श्रीराम बोलण्यास सांगून जबर मारहाण

narendra Modi

गुरुग्राम : येथे काही अज्ञात तरुणांनी एका २५ वर्षीय मुस्लिम युवकाला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने पारंपारिक टोपी घातली असल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मोहम्मद बरकत आलम असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. गुरुग्राम येथील जकोब पुरा परिसरात तो राहतो.

आलम याने स्थानिक पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, सदर बाजार परिसरात काही अज्ञात टवाळ तरुणांनी त्याला घेरलं आणि त्याने घातलेल्या पारंपारिक टोपीवर आक्षेप घेतला. ‘आरोपींनी मला धमकावलं. या परिसरात टोपी घालण्याची परवानगी नाही असं ते मला दम देऊन सांगू लागले. त्यानंतर त्यांनी माझी टोपी बळजबरीने काढली आणि माझ्या कानाखाली लगावली. यावेळी त्यांनी मला जोरजोरात भारत माता की जय अशी घोषणा देण्यास देखील सांगितलं’, अशी माहिती आलमने दिली आहे.

पुढे त्याने सांगितलं की, ‘मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे भारत माता की जय घोषणा दिली. नंतर त्यांनी मला जोरजोरात जय श्रीराम बोलण्यास सांगितलं, ज्यासाठी मी नकार दिला. यावेळी त्यांनी रस्त्यावरुन काठी उचलली आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझे पाय आणि पाठीवर खूप फटके दिले’. आलम याने सदर बाजार येथील मशिदीतून नमाज पठण करुन परतत असताना हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आपण मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर आपल्याच समाजातील काही लोक धावत आले. नंतर आरोपींनी पळ काढला अशी माहिती आलमने दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आलमची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्हीची मदतदेखील घेतली जात आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x