13 May 2021 1:13 AM
अँप डाउनलोड

प. बंगाल पंचायत निवडणुक, भाजपची ८५० मुस्लिम उमेदवारांना संधी

प. बंगाल : प. बंगाल पंचायत निवडणुकीत ३० टक्के लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज आणि त्यांच्या मतांची आकडेवारी लक्षात घेऊन भाजपने तब्बल ८५० मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. २०१३ मध्ये भाजपची हीच मुस्लिम उमेदवारांची संख्या १०० इतकी होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत भाजपने अखेरच्या क्षणी आपल्या रणनीतीत बदल करत मोठ्या प्रमाणावर मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे. १४ रोजी होऊ घातलेल्या पंचायत निवडणुकीत भाजपने ८५० मुस्लिम उमेदवार दिले आहेत. भाजप प. बंगालमधील वरिष्ठ नेत्यांच्या मते त्यांनी स्थानिक भाजपच्या राजकीय रणनीतीत हा मोठा बदल असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार देण्याचे ठरविले आहे.

स्थानिक भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अली हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, प. बंगालसारख्या राज्यात भाजपला अल्पसंख्याकांच्या संपर्कात राहावे लागणार असल्याने आणि इथे ३० टक्के लोकसंख्या ही मुस्लीम समाजाची आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने हा भाजपचा मुस्लिम मतांसाठी एक राजकीय बनाव असल्याचं म्हटलं असून, मुस्लिम समाज कधीच भाजपच्या आहारी जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1531)BJP(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x