15 July 2020 10:28 PM
अँप डाउनलोड

धनशाही पुढे लोकशाही हरली! कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार कोसळलं

Kumarswamy, JDS, Congress, BJP Karnataka, Karnataka Assembly

बंगळुरू : काँग्रेस, जेडीएसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरल्याने कुमारस्वामींचं सरकार अखेर कोसळलं आहे. काही दिवसापासून धनशक्तीच्या आधारे खेळला गेलेला हा डाव आज अखेर संपुष्टात आला असून, धनशाहीसमोर लोकशाहीने अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

मागील काही दिवसांपासून कर्नाटकमधील राजकीय परिस्थिती गोंधळलेली होती आणि संबंधित वाद सर्वोच्च न्यायालयात देखील पोहोचला होता. सत्ताधारी जनता दल (सेक्युलर) आणि कॉंग्रेसच्या तब्बल १५ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामागे भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षातील आमदारांना करोडोच्या ऑफर दिल्याचा आरोप यावेळी सत्ताधारी पक्षाने केला होता. त्यामुळे कर्नाटकमधील सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामींच्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आले. दरम्यान बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचं सरकार अपयशी ठरलं असल्याचे दिसून आले.

आज विधानसभेत कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र कुमारस्वामी यांचं सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलं. कुमारस्वामींचं सरकार कोसळलं. कॉंग्रेस आणि जेडीएसला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे कुमारस्वामींचं सरकार कोसळलं असल्याने आता भारतीय जनता पक्षाचा सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कर्नाटकात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#karnatak Assembly Election 2018(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x