11 December 2024 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली | ६ मोठ्या ब्रँण्डकडून कंगनासोबतचे करार रद्द

Six big brands, Cancelled Contracts, Kangana Ranaut

नवी दिल्ली, २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. दोन महिने शांततेत आंदोलन करणारे शेतकरी अचानक हिंसक कसे झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, या हिंसेला शेतकरी नव्हे तर इतर लोकच जबाबदार असल्याचं आता पुढे येऊ लागलं आहे. त्यात अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर ते राजकारणी अशा भूमिकेत असलेल्या लक्खा सिधानाची नावंही पुढे आली आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता या तिघांचाही या हिंसेतील रोल तपासण्याचं काम सुरू केलं आहे.

या हिंसक आंदोलनानंतर अभिनेत्री कंगणा रानौत देखील एका वर एक ट्विट करत वातावरण तापवू लागल्याचं पाहायला मिळालं. तिच्या नेहमीच्या शैलीत विखारी ट्विट करणं तिने सुरूच ठेवलं आहे. विशेष म्हणजे त्याची किंमत आता तिला भिगावी लागणार हे देखील दिसत आहे.

कारण सहा मोठ्या ब्रँण्डने कंगनासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहेत. याची माहिती स्वत: कंगनाने ट्विटरद्वारे दिली आहे. कंगना याबाबत म्हणाली की, ‘सहा ब्रँण्डनी माझ्यासोबतचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. काहींवर मी याआधीच करार केले होते. तर काही ब्रँण्डसोबत करार करणार होते. ते म्हणाले की, मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाले, त्यामुळे ते मला त्यांची ब्रँण्ड अ‍ॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत. त्यामुळे या सर्व ब्रँण्डना देखील मी अ‍ॅंटी नॅशनल दहशतवादी म्हणेन, असं कंगनाने स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: Six big brands have cancelled their contracts with Kangana. This information was given by Kangana herself through Twitter. “Six brands have cancelled their contracts with me,” Kangana said. Some I had already contracted with. So it was going to make deals with some brands. “I called the farmers terrorists, so they can’t make me their brand ambassador,” he said. Therefore, I would call all these brands as anti-national terrorists, Kangana has clarified.

News English Title: Six big brands have cancelled their contracts with Kangana Ranaut news updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x