13 December 2024 8:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

केंद्रीय गृहमंत्री दीप सिद्धूला किती वेळा आणि कोणत्या तारखेला भेटले होते | RTI अंतर्गत प्रश्न

Union minister Amit Shah, Deep Sidhu, Under RTI

नवी दिल्ली, 27 जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.

दुसरीकडे दीप सिद्धू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील यापूर्वी भेटल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यालाच अनुसरून आरटीआय एक्टिविस्ट साकेत गोखले यांनी RTI अंतर्गत थेट माहिती मागवताना, अमित शाह किती वेळा आणि कोणत्या तारखेला दीप सिद्धू याला भेटले होते असा प्रश्न केला आहे. त्यामुळे यावर नेमकी कोणती माहिती उपलब्ध होणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summary: On the other hand, photos of Deep Sidhu meeting Union Home Minister Amit Shah have also surfaced. Accordingly, RTI activist Saket Gokhale, while seeking information directly under RTI, questioned how often and on what date Amit Shah met Deep Sidhu. So we have to see exactly what information will be available on it.

News English Title: How many time and on which dates Union minister Amit Shah meet Deep Sidhu question asked under RTI news updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x