12 December 2024 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सुशांतसिंग प्रकरण | राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर, CBI चौकशीला विरोध

Sushant Singh Rajput case, Maharashtra government, opposes CBI intervention, Supreme Court

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट: अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला आहे. महाराष्ट्र सरकारने सील बंद लिफाफ्यात चौकशी कुठपर्यंत आली याबाबतची माहिती देण्यात आली. सुशांतसिंग प्रकरणी बिहार सरकारने नियमांविरुद्ध जाऊन काम केलं, असा आरोप महाराष्ट्र सरकारने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारने बिहारवर बरेच आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, बिहार सरकारने या प्रकरणात नियमांविरूद्ध काम केले आहे. बिहार सरकारला केवळ झिरो एफआयआर नोंदविण्याचा अधिकार होता. त्यांनी एफआयआर दाखल करुन आम्हाला पाठवायला हवा होता. महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, बिहार पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला हे चुकीचे आहे. तसेच अशाप्रकारे तपास करणं बेकायदेशीर असतो, तर बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कशी करू शकते. सीबीआय चौकशीची शिफारस केंद्रानेही मान्य करून चुकी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे की, सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस बिहार सरकारने करणे योग्य नाही. केंद्र सरकारने बिहारची अनधिकृत शिफारस मान्य करणे हे केंद्र-राज्य संबंधांच्या घटनात्मक निर्णयाच्या विरोधात आहे. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून सुप्रीम कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी पुढच्या तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे.

 

News English Summary: The Maharashtra government has replied to Riya Chakraborty’s petition in the Supreme Court in the death case of actor Sushant Singh Rajput. The Maharashtra government has opposed the CBI probe into the case in the Supreme Court. The Maharashtra government informed in a sealed envelope about the progress of the inquiry.

News English Title: Sushant Singh Rajput case Maharashtra government opposes CBI intervention in Supreme Court News latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x