28 March 2023 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला यांच्या पसंतीचा स्वस्त झालेला शेअर खरेदी करणार? तज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली Post Office Scheme | थेट 50 लाख रुपयांचा फायदा देणारी पोस्ट ऑफिसची योजना, फायद्यासह योजनेचा तपशील जाणून घ्या Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा
x

BREAKING | सीबीआयकडून SSR आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीविरोधात FIR

Sushant Singh Rajput, CBI, Vijay Mallya Case

मुंबई, ६ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. ज्यानंतर त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी करण्यात आला. सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार आता हे संपूर्ण प्रकरण CBI च्या हाती गेलं असून, सुशांतची प्रेयसी आणि त्याच्यासमवेत एकेकाळी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या अभनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

रियासह आणखी सहा जणांवर सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली. सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं अशी वारंवार मागणी केली जात होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. महाराष्ट्र सरकारने मात्र मुंबई पोलीस योग्यप्रकारे तपास करत असून बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही मागणी केली जात असल्याचा आरोप केला होता. सोबतच सीबीआयकडे तपास देण्यास विरोध केला होता.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची चौकशी करू शकते. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी आपल्या तक्रारीत आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं आहे. बिहार सरकारच्या शिफारसीनंतर केंद्राने सीबीआयकडे वर्ग केले आहे.

 

News English Summary: Actor Sushant Singh Rajput suicide case was investigated by various organs. The entire case is now in the hands of the CBI, which has registered an FIR against Sushant’s girlfriend and actress Riya Chakraborty, who was once in a live-in relationship with him.

News English Title: Sushant Rajput Death To Be Probed By CBI Team Investigating Vijay Mallya Case News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x