28 March 2023 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला यांच्या पसंतीचा स्वस्त झालेला शेअर खरेदी करणार? तज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली Post Office Scheme | थेट 50 लाख रुपयांचा फायदा देणारी पोस्ट ऑफिसची योजना, फायद्यासह योजनेचा तपशील जाणून घ्या Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा
x

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Bollywood, Actor Sushant Singh Rajput, Commit Suicide

मुंबई, १४ जून : मोठ्या पडद्यावर महेंद्रसिंग धोणीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सुशांतने आज दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी त्याचे मित्रही आले होते. मित्रांसोबत दिवस घालवण्यानंतर दुपारी तो आपल्या खोलीत गेला, तो परत आलाच नाही. घरातील नोकराला सुशांतने गळफास घेतल्याचं आढळून आलं.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

बिहारमधील पाटणा येथे त्याचा जन्म झाला. त्याने दिल्लीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. छोट्या पडद्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास अगदी हेवा वाटेल असाच आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

News English Summary: Bollywood Actor Sushant Singh Rajput, who plays Mahendra Singh Dhoni on the big screen, committed suicide by hanging himself at his residence. The sudden exit of Sushant Singh Rajput has created a stir in Bollywood.

News English Title: Bollywood Actor Sushant Singh Rajput committed suicide by hanging himself at his residence News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x