30 May 2023 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची खासगी बस ट्रॅव्हल्सकडून लुट सुरु, शिंदे सरकारच्या परिवहन विभागाचा कानाडोळा

Konkan Festival

Konkan Ganeshotsav Festival Private Bus Ticket Cost | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार येताच सणासुदीत मोठ्या घोषणा केल्या खऱ्या, परंतु दुसऱ्या बाजूकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचं पाहायला मिळतंय. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी अनेक कोकणवासी गावी जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ कोकणवायीयांसाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकूण मुबई आणि आसपासच्या शहरांमधून कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या त्या तुलनेत खूप अधिक आहे.

तिकिटांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ :
दोन वर्षानंतर प्रथमच यंदा गणेशोत्सव साजरा होत असल्याने कोकणात जाण्यासाठी नोकरदार वर्गामध्ये मोठा उत्साह आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आधीच सर्व रेल्वे आणि बस फूल्ल झाल्या आहेत. रेल्वे आणि बसचे आरक्षण फूल्ल झाल्याने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी आता आपला मोर्चा हा ट्रॅव्हल्सकडे ओळवला आहे. याच संधीचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदारांनी देखील आपल्या तिकिटांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. ट्रॅव्हलचे दर वाढल्याने चाकरमान्यांना प्रवासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. तर अनेक जण मिळेल त्या वाहनाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असल्याचे पहायला मिळत आहेत.

रत्नागिरीला जायचं असल्यास 800 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 1500 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत. सावंतवाडीला जायचं असल्यास 1500 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 2700 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत. राजापूरला जायचं असल्यास 1200 रुपये नियमीत भाडे आहे. सध्या 2000 रुपये खासगी ट्रव्हल्सकडून आकारतायत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात भरमसाठ तिकिटदर आकारुन खासगी ट्रॅव्हल्सकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात लुट चालू आहे. हे सर्व उघडपणे चालू असूनही त्याविरोधात राज्य परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप कोकणी प्रवाशांनी केला आहे.

मुंबई गोवा मार्गावर खड्डे युक्त रस्ते :
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल इथेच संपत नाही तर त्यांना आणखी एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा. मुंबई-गोवा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने प्रवास धोकादायक झाला आहे. रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने प्रवासाच्या वेळेत जवळपास दीड ते दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीची मागणी सुरू आहे. मात्र त्याला काही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Konkan Ganeshotsav Festival Private Bus Ticket Cost check details 27 August 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x