12 December 2024 1:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Health First | गुणकारी शेंगदाणे | भूक आणि पचनशक्ती वाढविण्यासाठी उत्तम

Peanuts, improves digestion, Increases appetite, health fitness

मुंबई, २१ ऑक्टोबर : शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात. शेंगदाणा पासून विविध प्रकारचे विटामिन सुद्धा मिळतात जसे की, इ, क, आणि बी इत्यादी.

काय आहेत शेंगदाणा खाण्याचे फायदे:
जर आपल्याला खोकला येत असेल तर शेंगदाणा उपयुक्त अशा औषधाचे काम करते. शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच काही लोकांना भूक न लागण्याची समस्या असते ती दूर होते.दुसरे म्हणजे गर्भवती स्त्रियांसाठी शेंगदाण्याचे सेवन अतिशय फायद्याचे असते. गर्भावस्थेत असलेल्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायद्याचे असते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा ६ फॅट्स सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्वचेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे शेंगदाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.

साधारणतः जेवण झाल्यानंतर जर आपण पन्नास ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते आणि रक्ताची कमतरता भासत नाही. आठवड्यातून कमीत-कमी तीन ते चार दिवस शेंगदाण्याचे सेवन केले तर हृदयविकार होण्याच्या संभव कमी होतो. रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. लीपो प्रोटीन नावाच्या कोलेस्ट्रॉलची मात्रा जवळजवळ ७.४ टक्के घटते. प्रोटीन, फायबर, विटामिन आणि एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्याचाही त्वचेसाठी फायदा होतो. महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी दररोज थोडसे शेंगदाणे खाणे फायद्याचे असते.

शेंगदाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण असल्यामुळे पोटाचे विकार नाहीसे होतात. शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने ऍसिडिटी आणि गॅसपासून मुक्तता मिळते. अशा या गरिबाचे बदाम म्हटल्या गेलेल्या शेंगदाण्याचे सेवन जर आपण नियमितपणे केले किंवा वरती सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून तीनदा जरी खाल्लेत तरी आरोग्यासाठी याचा भरपूर फायदा होतो.

 

News English Summary: Groundnuts are abundant in protein, healthy fats and dietary fibre. Groundnuts are immensely rich in potassium, calcium, phosphorus and B vitamins which offers you with a host of health benefits. Groundnuts are a great blend of healthy fats, protein and fibre that curbs your appetite, lowers the risk of heart disease and regulates blood glucose levels. Referred as Kalaya in ancient Ayurveda, peanuts found mention in the ayurvedic texts around 14th century for its ability to balance, heal and treat those health conditions caused due to kapha and pitta doshas. The traditional medicine practitioners recommend peanuts for battling skin and hair conditions, memory loss, diabetes, weight loss and more. Groundnuts are an ideal snack for the diabetics as it aids in lowering blood sugars. Grab a fistful of roasted peanuts to control hunger pangs and also to prevent sudden spike in the levels of blood sugars. Studies reveal that peanuts are loaded with 21% of manganese for every 100 grams which plays a major role in absorption of calcium, regulation of blood sugar.

News English Title: Peanuts improves digestion and increases appetite health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x