26 July 2021 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

आनंदाची बातमी! जगात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

Corona virus, global portal WorldMeter

नवी दिल्ली, १४ जून: जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगातील एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे यावर देखरेख करणार्‍या जागतिक पोर्टल वर्ल्डमीटर या संस्थेने म्हटले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जगातील विविध देशांमध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत कोरोनाचे एकूण रुग्ण ७८ लाख २ हजार ८६० होते. यातील ४० लाख ३ हजार १३२ रुग्ण बरे झाले आहेत. एकट्या अमेरिकेत २१ लाखापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण असून तेथे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८ लाख ४० हजारांपेक्षा जास्त आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावरील रशियातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.

भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून शनिवारी सायंकाळपर्यंत भारतात ११ हजार ४५८ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात काल दिवसभरात ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ८ हजार ९९३ झाली आहे. भारतातील कोरोना मृतांची संख्या ८,८८४ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातही बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.

महाराष्ट्रात शनिवारी कोरोनातून बऱ्या झालेल्या १५५० जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३४६ झाली आहे. आज कोरोनाच्या ३४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

News English Summary: More than half of the world’s coronavirus patients have recovered, and the number of patients recovering from new cases is rising, according to the global portal WorldMeter.

News English Title: More than half of the world  coronavirus patients have recovered according to the global portal WorldMeter News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1388)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x