कोरोना लस निर्मितीवरून अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि कॅनडामध्ये वाद
वॉशिंग्टन, १७ जुलै : जगभरात कोरोनाचा फैलाव वाढत असून अद्यापही करोनावरील लस उपलब्ध न झाल्याने रशियाच्या या संशोधनामुळे दिलासा व्यक्त केला जात होता. पण आता अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाच्या दाव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राने केलेल्या आरोपानुसार, APT29 या हँकिंग ग्रुपने लसीसंबंधी संशोधन कऱणाऱ्या ब्रिटनमधील प्रयोगशाळांवर सायबर हल्ले केले आणि महत्त्वाची माहिती चोरली. APT29 ला Cozy Bear या नावानेही ओळखलं जातं. रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, APT29 ही रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा भाग असून करोनावरील लसींची माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करत आहे.
ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राचे (एनसीएससी) संचालक पॉल चेचेस्टर यांनी म्हटलं आहे की, “करोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी करणाऱ्यांविरूद्ध अशा सायबर हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो”. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी निवदेनात म्हटलं आहे की, “करोनाशी लढा देण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना रशियन गुप्तचर यंत्रणांनी अशा पद्धतीने टार्गेट करणं अमान्य आहे”.
“एकीकडे काहीजण आपल्य स्वार्थी आणि चुकीच्या वर्तनातून आपला स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना इंग्लंड आणि त्यांचे सहकारी देश लस मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत,” असंही ब्रिटनने म्हटलं आहे. विशेष म्हणजे मे आणि ब्रिटनने अमेरिकेने म्हटले होते की, हॅकर्सच्या नेटवर्कने कोरोनाला सोडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना लक्ष्य केले, परंतु रशियाचा यात सहभाग असल्याचे म्हटले जात नाही. आता अमेरिका, ब्रिटन तसेच कॅनडा असेही म्हणते की रशिया हॅकर्सच्या माध्यमातून लस कार्यक्रमाविषयी महत्वाची माहिती चोरत आहे.
दरम्यान, गुप्तचर संस्थांचे अधिकारी सातत्याने या चोरीच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत माहिती चोरीला गेली का, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या दाव्यानुसार, आतापर्यंत कोणतीही गुप्त माहिती चोरीला गेलेली नाही. अमेरिकेने याआधी कोझी बीअर हॅकिंग गटाबाबत माहिती मिळवली होती. हा गट रशियन सरकारशी निगडीत असलेल्या गटांपैकी एक आहे. या गटाने २०१६मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी काही इमेल चोरले असल्याचे समोर आले होते.
याआधीदेखील अमेरिका, जर्मनीने चीनवर अशाप्रकारचे आरोप लावले होते. चीन आम्ही विकसित करत असलेल्या लससंदर्भात माहिती चोरत असल्याचा आरोप अमेरिका, जर्मनीने केला होता. चीन सरकारशी संबंधित हॅकर्सकडून हे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता.
News English Summary: The spread of the corona is growing worldwide, and Russia’s research has been a relief as coronavirus vaccines are still not available. But now claims from the United States, England and Canada have begun to surface.
News English Title: United States England and Canada have made allegations on Russia over Covid 19 vaccine production News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या