16 April 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं? IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय?
x

AIDS'वर लस बनवण्याच्या प्रयोगातून विनाशकारी कोरोना विषाणू तयार झाला: लूक मॉटेंग्नियर

Covid 19, Corona Crisis, scientist Luc Montagnier, AIDS vaccine at Wuhan Lab

पॅरिस, २१ एप्रिल: चीनमधील वैज्ञानिकांनी वुहान येथील मांसविक्री केंद्रामधून करोनाचा मानवामध्ये संसर्ग झाल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकेमधील अनेक तज्ञांनी वुहानमधून करोनाचा विषाणू जगभरात पसरण्यामागे या शहरामधील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेचा संबंध असल्याचे मत व्यक्त केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ य़ांनीही या विषाणूची निर्मिती कशी झाली यासंदर्भात अमेरिकेकडून चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे.

दुसरीकडे, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सोमवारी चीनकडे एक विनंती केली. करोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात चीनने स्पष्टपणे माहिती द्यावी असं मार्केल यांनी म्हटलं आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटनपाठोपाठ जर्मनीसारख्या बड्या देशाने अशी मागणी केल्याने करोनाचा संसर्ग मानवामध्ये कसा झाला यासंदर्भात माहिती उघड करण्याचा चीनवरील दबाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

आता नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक यांनी एक आश्चर्यकारक दावा केला आहे. त्यांनी कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमधून पसरला असल्याचा दावा केला आहे. २००८ मध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारे फ्रान्सचे वायरोलॉजिस्ट लूक मॉटेंग्नियर यांनी, चीनमधील प्रयोगशाळेत एड्सवरील लस बनवण्याच्या प्रयत्नांतून कोविड-19’चा जन्म झाला असल्याचं सांगितलं आहे. लूक यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगातील विज्ञान आणि राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेत झाली असून हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा दावा लूक यांनी केला आहे. लस बनवण्याच्या प्रयत्नांतून हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक विषाणू तयार झाला असल्याचं ते म्हणाले. लूक यांनी असा दावा केला आहे की, एचआयव्ही आणि मलेरियाचे घटक कोरोना विषाणूच्या जीनोममध्ये सापडले आहेत आणि त्यामुळे व्हायरस नैसर्गिकरित्या तयार होऊ शकत नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

लूक यांनी फ्रान्समधील एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, वुहानची बायोसेफ्टी लॅब २००० पासून कोरोना व्हायरसवर संशोधन करत आहे. त्यामुळे नोवेल कोरोना व्हायरस एखाद्या प्रकारच्या औद्योगिक अपघाताचा परिणाम असू शकतो.

 

News English Summary: French virologist and medicine Nobel laureate Luc Montagnier sparked controversy Sunday when he claimed that the virus – officially called SARS-CoV-2 – was not only man-made but is the result of a Chinese attempt to produce a vaccine against AIDS.

News English Title: Story Corona virus created in an attempt to find AIDS vaccine says Nobel award winner scientist Luc Montagnier Covid 19 News Latest Updates

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x