13 December 2024 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

चेक महागात पडला; इमरान खान यांना चेक देणारी व्यक्ती कोरोना पॅझिटिव्ह

Pakistan PM Imran Khan, Covid 19, Corona Crisis

इस्लामाबाद, २१ एप्रिल: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची करोना व्हायरसची चाचणी होऊ शकते किंवा त्यांना आयसोलेशनमध्ये राहायला सांगितले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी इम्रान खान पाकिस्तानातील एका प्रसिद्ध समाजसेवकाला भेटले होते. त्या समाजसेवकाचा करोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून इम्रान खान यांची सुद्धा Covid-19 ची चाचणी केली जाईल किंवा त्यांना आयसोलेशनमध्ये रहायला सांगितले जाऊ शकते. द हिंदू ने हे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मदत म्हणून सामाजिक कार्यकर्ते फैसल एधी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना एक चेक दिला होता. मात्र, आता फैसल एधी यांना कोरोनाची लागण झाल्याने पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. इदी फाऊंडेशनचे अध्यक्ष फैझल इदी यांनी मागच्या आठवडयात इम्रान खान यांची भेट घेतली होती. त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

पाकिस्तानात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत येथे ८ हजार ४१८ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर १७६ जणांचा कोरनामुळे मृत्यू झाला असून १ हजार ९७० जण बरे होऊन घरी गेले आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

 

News English Summary: Pakistan’s Prime Minister Imran Khan could be tested for the corona virus or be told to stay in isolation. A few days ago, Imran Khan met a famous social worker in Pakistan. The Coroner’s test report for that social worker has come positive. Therefore, as a precaution, Imran Khan will also be tested on Covid-19 or he may be asked to stay in isolation. The Hindu has reported this.

News English Title: Story Pakistan Prime Minister Imran Khan may get tested for Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x