19 July 2019 9:37 AM
अँप डाउनलोड

जी-२० परिषद: मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

जी-२० परिषद: मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

ओसाका: जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-२० परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल नरेंद्र मोदींचं अभिनंदन देखील केलं. तर नरेंद्र मोदींनी या भेटीत एकूण ४ महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. यानंतर या दोन्ही नेत्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी देखील अनेक विषयांना अनुसरून चर्चा केली.

दरम्यान डोनल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘भारतातील सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही या विजयास पात्र आहात. जेव्हा २०१४ मध्ये तुम्ही पहिल्यांदा निवडणूक जिंकलात, तेव्हा अनेक गट आपापसात लढत होते. परंतु आता ते एकत्र आले आहेत. यातून तुमची अद्भुत क्षमता दिसते,’ अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी मोदींचं प्रचंड कौतुक केलं. ट्रम्प यांनी केलेल्या कौतुकाबद्दल मोदींनी त्यांचे जाहीर आभार मानले. भारत आणि अमेरिकेत इराण, ५जी, संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा होईल, असं मोदींनी म्हटलं.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Donald Trump(27)#Narendra Modi(880)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या