21 November 2019 7:17 AM
अँप डाउनलोड

व्हिडिओ: असा झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा CNN च्या पत्रकारासोबत वाद

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना CNN चा पत्रकाराचा प्रश्न झोंबल्याने त्यांचा त्या पत्रकारासोबत वाद झाला. विशेष म्हणजे या वादानंतर पत्रकाराचे थेट ओळखपत्र सुद्धा काढून घेण्यात आले. जिम अकोस्टा असे या संबंधित पत्रकाराचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना थेट विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला असता ही घटना घडली.

दरम्यान, त्या प्रश्नामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या राग अनावर झाला आणि त्यांनी या पत्रकाराला थेट खाली बसायला सांगितले. पुढे ते असे ही म्हणाले की, तर तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा ‘सीएनएन’ सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. कारण, तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही आणि तू एक उद्धट माणूस आहेस, असा दम पत्रकाराला भरण्यात आला आणि अपमानित करण्यात आले.

अमेरिकेतील मध्यवर्ती निवडणुकांच्या दरम्यान तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला? असा प्रश्न या पत्रकाराने विचारला म्हणून या पत्रकाराला ट्रम्प यांनी अपमानित केले. परंतु, त्यानंतर सुद्धा पत्रकाराने आपली जिद्द कायम ठेवत ट्रम्प यांच्याकडे पुन्हा दुसरा प्रश्न उपस्थित केला. आणि प्रश्न होता की, २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली तेव्हा त्यात रशियाचा सहभाग होता, असा आरोप करण्यात आला होता, त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? असा प्रश्न विचारला. मात्र त्यानंतर ते अधिकच चिडले आणि ते त्याच्यावर जोराने खेकसले आणि अपमानित केले.

ट्रम्प यांनी त्याला सुनावताना म्हटले की, “पत्रकार असून तुला लोकप्रतिनिधींशी आणि लोकांशी कसे वागावे ते सुद्धा समजत नाही. आणि तुझ्यासारखा माणूस सीएनएन मध्ये कसा काय काम करू शकतो? तुझ्यासारख्या माणसाला आणि तुझ्या चॅनलला फक्त फेक न्यूज चालवायच्या असतात ज्यामुळे तुम्हाला टीआरपी मिळतो, पण तुम्ही हा देश चालवू शकत नाही आणि ते माझे काम आहे असे सुद्धा ट्रम्प यांनी या पत्रकाराला तावातावाने सुनावले.

दरम्यान CNN या वृत्तवाहिनीने सुद्धा ट्रम्प यांना सुनावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्रकार तसेच पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टीकोनच मुळात चुकीचा आहे. ट्रम्प हे केवळ धोकादायक नाहीत तर देशाला अस्वस्थ करणारे अमेरिकन आहेत. त्यांना पत्रकारितेचे स्वातंत्र्य सुद्धा मान्य नाही आणि हे त्यांनी याआधी स्पष्ट केले आहे आणि ते त्यानुसारच वागत आहेत. त्यामुळे आम्ही आमचा पत्रकार जिम अकॉस्टा याच्या पाठिशी ठाम पणे उभे आहोत आणि त्याने तुमच्यासोबत कोणताही उद्धटपणा केलेला नाही, असे ट्विट CNN ने प्रसिद्ध केले आहे.

काय आहे तो वादाचा व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Donald Trump(40)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या