रत्नागिरी: आधीच खंबाटा आणि नाणार सारखया विषयांवरून पक्षाला अडचणीत आणणारे खासदार विनायक राऊत सध्या त्यांच्या कोकणातील वायफळ भाषांबाजीतून स्वतःच्या पक्ष नैतृत्वाला खुश करण्याचे केविलवाणे प्रयत्न सातत्याने करत आहेत. मोदीलाटेत लोकसभेला रत्नागिरी मतदारसंघातून निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांचा राणे कुटुंबियांवर आरोप करून आणि खालच्या भाषेतील शब्द वापरून पक्ष नैतृत्वाला खुश करणे हा एकमेव कार्यक्रम सुरु आहे. मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले की विकासाचा मुद्दा राहिला लांब आणि केवळ राणे कुटुंबीय हेच त्यांचं एकमेव लक्ष असायचं स्थानिक प्रसार माध्यमांच्या सुद्धा निदर्शनास येते आहे.
तसाच एक प्रयत्न त्यांनी २-३ दिवसांपूर्वी करून पुन्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या इतिहासाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. आपण खासदार म्हणून निवडणून आल्यावर कोकणच्या जनतेसाठी कोणती विकासाची १० कामं केली असा त्यांना विचारल्यास ते त्यांचा इतिहासातील दाखले देऊन बोलू लागले तरी ती १० कामं ते सांगू शकणार नाहीत. परंतु, खंबाटा, शालिनी टॅब सारख्या अनेक विषयांमध्ये खोलवर गेल्यास त्यांची बरीच कामं बाहेर येतील.
सध्या राणे कुटुंबीयांनी येथे जोरदार पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली असून, स्वतः खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, निलेश राणे आणि त्यांचे पदाधिकारी मतदारसंघात ठाण मांडून पक्ष विस्तार करताना दिसत आहे. त्यामुळे २०१९ ची वाट बिकट झाल्याचे दिसत असताना, त्यांनी थेट राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन मदतीची याचना केली होती. त्यावेळीच त्यांची दयनीय अवस्था समोर आली होती. त्यामुळे नारायण राणेंवर बेछूट आरोप करून आणि वायफळ भाषणातून मागचा इतिहास काढणे हाच त्यांचा सध्या कोकणात कार्यक्रम आहे.
त्याचाच परिणाम असा झाला की माजी खासदार निलेश राणे यांनी थेट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याच इतिहासाला हात घातला आणि संपूर्ण शिवसेनेलाच तोंडघशी पडले आहे. या सर्व घडामोडी मागील मूळ कारण हे खासदार विनायक राऊत यांच्या भाषणातील वायफळ विषयांवरील वायफळ चर्चाच कारणीभूत आहे असाच म्हणावं लागेल. त्यांनी असेच प्रकार सुरु ठेवल्यास शिवसेनेतील खडानखडा माहित असलेले नारायण राणे बरीच गुपितं बाहेर काढतील आणि शिवसेनेच्या अडचणी वाढवतील यात जराही शंका नाही.
