मुंबई : शिवसेना साधी नखं कापली तरी स्वतःला शहीद म्हणवून घेत फिरते अशी शिवसेनेची सध्याची परिस्थिती आहे अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. गुरुवारी मुंबईमध्ये पत्रकारांशी ते संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी हे भाष्यं केलं.

राज्यातील पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आणि शिवसेनेच्या पवित्र्यामुळे त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होत आहे. तिथे शिवसेनेने काँग्रेसच्या विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

शिवसेनेच्या याच दुपट्टी भूमिकेवर राम कदम यांनी टीका केली आहे. शिवसेनेने पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे असा टोला राम कदमांनी लगावला आहे.

bjp mla ram kadam criticised shivsena over stand in state by poll election