आज या विकृत लोकांच्या तावडीत देश गेला आहे, छत्रपती शिवरायांच्या अवमान नाट्यांवर उदयनराजे संतापले

MP Udayanraje Bhonsale | छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श म्हणणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजे आज रायगडावर जाऊन भूमिका मांडली आहे.
उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्यानं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन रायगडावर जाणार असल्याची घोषणा केली होती.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहे त्यावर बोलत असतांना उदयनराजे यांनी राज्यात जातीय विषमता पसरत असल्याचे देखील म्हंटले आहे. राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा वापर सोईनुसार केला असून सोईप्रमाणे इतिहास सांगितला जातो,चित्रपट, लेखक अशा सर्वच ठिकाणी इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे. उदयनराजे यांनी राजकारण्यांनी वेळोवेळी जातीय विषमता निर्माण केली आहे, याशिवाय राज्यपाल इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
विकृत लोकांच्या तावडीत देश
राष्ट्रपुरुषांचा खिल्ली उडवल्यासारखा अवमान केला जात आहे. त्यांचा अपमान म्हणजे आम्हा सगळ्यांचा अपमान आहे. आपण काही करणार आहे की नाही. आपण सगळे फक्त राजकारण्यांच्या तावडीत किती दिवस राहणार आहात. पूर्वी मुघलांच्या तावडीत हा देश होता, आज या विकृत लोकांच्या तावडीत देश गेला आहे. हे सांगताना खंत वाटते. यातून सुटका झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते.
आज लोकशाहीमध्ये तुम्ही सज्ञान आहात ते राजे आहात. तुमच्यामुळे हे आमदार आहे, खासदार आहे, यांच्यामुळे तुम्ही नाही. तुमच्यामुळे ते आहेत. लाज वाटत नाही, या लोकांना शिवरायांचं नाव घेताना. स्वार्थ साधल्यानंतर एकही व्यक्ती धारिष्ठ दाखवत नाही. का ठामपणे मत व्यक्त करत नाही. असं झालं तसं झालं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर प्रोटोकॉल आहे, असं शिवाजी महाराजांनी बाळगले असते तर आज आपण गुलामगिरीत असतो. हे विसरता कामा नये, कुठला प्रोटोकॉल, चुकू ती चुकू आहे. तुम्ही जर याचं समर्थन करत असेल तर ते तेवढेच दोषी आहे. या सर्वांना जागा दाखवायची आहे, असं उदयनराजे म्हणाले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MP Udayanraje Bhonsale angry after controvesial statement on Chhatrapati Shivaji Maharaj check details on 03 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Mangalam Seeds Share Price | जबरदस्त शेअर! 22 दिवसांत 130% परतावा दिला या शेअरने, स्टॉक डिटेल्स नोट करा
-
Gold Price Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीत घसरण, आजचे नवे दर जाणून घ्या
-
360 ONE WAM Share Price | मस्तच! तिहेरी फायदा देणारा शेअर, गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट प्लस डिव्हीडंड
-
Goldstone Technologies Share Price | मस्तच! जोरदार कमाई सुरु, या शेअरने फक्त 5 दिवसात 53% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Sharda Cropchem Share Price | जोरदार कमाई! या 400% परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, पैसा देणाऱ्या स्टॉकची डिटेल्स
-
Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा
-
Comfort Intech Share Price | बापरे! 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा
-
Torrent Pharmaceuticals Share Price | जबरदस्त शेअर! 240% मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख तपासा
-
Stocks To Buy | बँक FD वार्षिक व्याजापेक्षा चौपट परतावा देतील हे 4 शेअर्स, येथे पैसा वाढवा
-
Sunflag Iron & Steel Company Share Price | शेअर बाजार पडला तरी हा शेअर वाढतोय, भारत सरकारही आहे क्लाईंट, स्टॉक डिटेल्स पहा