28 June 2022 9:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा
x

मुबईकरांची लूट करणाऱ्या ‘पे अ‍ॅण्ड पार्क’विरोधात मनसे आक्रमक

मुंबई : मनसे मुंबई महानगरपालिकेच्या नवीन सशुल्क वाहनतळ म्हणजे ‘‘पे अ‍ॅण्ड पार्क’ धोरणाविरोधात आक्रमक झाली आहे. तसेच शहरातील सामान्यांची लूट करणार हे धोरण लवकरच रद्द केले नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा थेट इशारा मनसेचे विभागप्रमुख विजय लिपारे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच मनसे उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करेल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिकेने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चे धोरण हे प्रथम प्रायोगिक तत्वावर ‘ए’ प्रभागात राबविले आहे. परंतु नंतर ते संपूर्ण मुंबई शहरात अंमलात आणण्याचा मुंबई पालिका प्रशासनाचा मानस आहे. मुंबई पालिका प्रशासन हेच धोरण ‘ई’ प्रभागातील भायखळा पूर्वेकडील ई.एस. पाटणवाला मार्ग, बकरी अड्डा येथील ना.म. जोशी मार्ग या ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क सुरू येथे राबविणार आहे.

पुढे विजय लिपारे यांनी सांगितलं की, मुंबईच्या गिरणगाव परिसरात महापालिका कर्मचारी वसाहत, महापालिका शाळा व मोठ्या संख्येने चाकरमान्यांची वस्ती आहे. तसेच जुन्या बैठ्या चाळी व म्हाडाच्या इमारतींमध्ये अद्याप पार्किंगची व्यवस्थाच नाही. तर दुसरीकडे मुंबईतील टॅक्सीचालक व माल वाहतूक करणारे चालक याच मार्गांवर रात्रीच्या वेळेस पूर्वापारपासून गाड्या पार्क करत आहेत. त्यामुळे, येथील चालकांकडे या ठिकाणी गाड्या पार्क करण्यावाचून दुसरा पर्याय सुद्धा नाही.

तसेच या ठिकाणी राहणारे लोक आणि पूर्वापार गाड्या पार्क करणारे कोणी श्रीमंत नाहीत, तरी मुंबई पालिका या ठिकाणी ‘ए वर्गा’चे शुल्क आकारणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे हे नवीन पे अँड पार्कचे धोरण आणि त्यांचे शुल्क येथील सामान्य वाहनचालक व मालकांना परवडणारे नाही. त्यामुळे स्थानिक लोकांना आणि छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या चालकांना हे महागडे दार कसे परवडणार असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

मनसे लवकरच मुंबई पालिकेच्या नव्या पे अँड पार्क धोरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असून पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील राजन शिरोडकर हा खटला न्यायालयात मांडतील असं विजय लिपारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

मुंबई पालिकेचे ई.एस. पाटणवाला मार्गाचा समावेश ‘ए वर्गा’त केला आहे आणि त्याप्रमाणे दुचाकी व चारचाकीसाठीचे नवे दार खालील प्रमाणे असतील ते सामान्यांना रोज कसे परवडतील ?

दुचाकी पार्किंग:

१. पहिल्या तासासाठी – १८ रुपये
२. १ ते ३ तास – ५३ रुपये
३. ३ ते ६ तास – ७१ रुपये
४. ६ ते १२ तास – ८९ रुपये
५. १२ तासानंतर – १०६ रुपये
६. सकाळी ८ ते रात्री ८ (महिनाभर) – १,९४७ रुपये
७. रात्री ८ ते सकाळी ८ (महिनाभर) – ९७४ रुपये

तीनचाकी व छोट्या चारचाकी वाहनांसाठी

१. पहिल्या तासासाठी – ७१ रुपये
२. १ ते ३ तास – ८९ रुपये
३. ३ ते ६ तास – १२४ रुपये
४. ६ ते १२ तास – २१३ रुपये
५. १२ तासानंतर – २४८ रुपये
६. सकाळी ८ ते रात्री ८ (महिनाभर) – ४,६७३
७. रात्री ८ ते सकाळी ८ (महिनाभर) – २,३३६

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x