21 October 2019 4:30 PM
अँप डाउनलोड

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीक पक्षाची बहुमताकडे घोडदौड

वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे. परंतु, अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याने तो डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय धक्का असल्याचे राजकीय जाणकारांना वाटतं आहे.

अमेरिकी संसदेच्या वरिष्ठ सदनातील एकूण १०० जागांपैकी ३५ जागा तर कनिष्ठ सदनामध्ये ४३५ जागांवर खासदार निवडले जाणार आहेत. त्यासाठी मंगळवारी मतदान पार पडलं होतं. आज पूर्ण निकाल जाहीर होणार आहेत.

दुसरीकडे, टेक्सासमध्ये टेड क्रूज पुन्हा विजयी झाले आहेत. सीनेटमध्ये ट्रम्प याच्या रिपब्लिकन पक्षाचेच वर्चस्व यंदाही स्पष्ट दिसून येत आहे. परंतु, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याने वर्चस्वावरून मोठी लढाई होण्याची चिन्हं आहेत. सीनेटमध्ये ऐकवून १०० पैकी ९४ जागांवर निकाल जाहीर झाले असून त्यापैकी ५१ जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर तब्बल ४२ जागांवर डेमॉक्रेटीक पक्षाचे खासदार निवडून आल्याने त्यांनी सुद्धा जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे.

दरम्यान, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये ४३५ जागांपैकी आतापर्यंत ३३९ जागांवरील निकाल घोषित झाले आहेत. त्या जाहीर निकालांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला १६६ जागा तर डेमॉक्रेटीक पक्षाला १७३ जागा मिळाल्या आहेत. परंतु, अद्याप ९६ जागांवरील निकाल अजून येणे बाकी आहेत आणि डेमॉक्रेटीक पक्षाची जोरदार मुसंडी पाहता डोनाल्ड ट्रम्प यांना हार मानावी लागणार असल्याचे स्पष्ट होणार आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(39)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या