21 October 2019 4:16 PM
अँप डाउनलोड

डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत आणीबाणी लादण्याचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा निधी अमेरिकी काँग्रेसने अनेक दिवसांपासून रोखून धरला आहे. त्यामुळे अमेरिकेत ‘शटडाउन’ सुरू आहे. दरम्यान, त्याअनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमाभागाचा दौरा केला. त्यानंतर केलेल्या पाहणीत त्यांनी देशात थेट आणीबाणी लादण्याचा इशारा पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे.

सीमेवर भिंत बाधण्यासाठी ५ अब्ज ६० कोटी डॉलरचा इतका मोठा निधी ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसकडे मागितला आहे. मेक्सिकोतून येणाऱ्या बेकायदा स्थलांतरितांना रोखण्यासाठी; तसेच अमली पदार्थाची तस्करी पूर्णतः रोखण्यासाठी ही भिंत आवश्यक असल्याचे मत ट्रम्प यांनी मांडले आहे.

डेमोक्रॅटिक या प्रमुख विरोधी पक्षाने सदर प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, या राजकीय घटनेमुळे अमेरिकेतील सरकारवर याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Donald Trump(39)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या